Bachchu Kadu News  Sarkarnama
विदर्भ

Bachchu Kadu News : अमरावतीत राजकीय नाट्य; सभेच्या मैदानावरून पोलिस अन् बच्चू कडूंमध्ये तुफान बाचाबाची!

Lok sabha Election 2024 : सभेसाठी मैदान मला मिळूनही ऐनवेळी अमित शाहांच्या सभेसाठी मैदान; कडूंचा आक्रमक पवित्रा...

Chetan Zadpe

Amravati News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेसाठी भाजप आक्रमक असून, ते प्रशासनाच्या माध्यमातून अमरावतीचे सायन्स स्कोअर मैदान ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत, असा गंभीर आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी केला होता. त्यांनी प्रहारची 24 एप्रिल रोजी सायन्स स्कोअर मैदानावर सभा होईल, असे स्पष्ट करत 23 एप्रिलपासून आम्ही ते मैदान ताब्यात घेऊ, असेही त्यांनी सांगितले. यासाठीची प्रहारची बुकिंग असून, त्याचे पैसे भरल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला. आता मैदान नाकारल्याच्या कारणावरून कडू आणि पोलिस यांच्यात जोरदार बाचाबाची झाली आहे. (Amaravati Latest News)

बच्चू कडू यांना पोलिसांनी रोखल्यानंतर पोलिस आणि कडू यांच्यात जोरदार बाचाबाची झाली आहे. कडू म्हणाले, "नियम तोडून जर अमित शाह सभा घेत असतील तर आता काही शिल्लक नाही राहिलं. यांच्या बदल्या होऊ नयेत म्हणून पोलिस भाजपच्या कार्यकर्त्यांसारखं वागत आहेत. अमित शाहांच्या सभेसाठी परवानगी असेल तर मला दाखवा. शाहांच्या सभेला परवानगी न मिळताच सभा होणार आहे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलिस अधिकारी गणेश शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात जोरदार वादविवाद झाले. कडू म्हणाले, "तुम्ही पोलिस भाजपच्या कार्यकर्त्यांप्रमाणे वागत आहात, तुम्ही भाजपचा दुपट्टा घालून या. अमित शाह यांच्या आधी मी हे मैदान बुक केले आहे. त्यासाठी मला प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र, ऐनवेळी अमित शाह यांची सभा कशी काय होऊ शकते का? देशात नियम, कायदा, लोकशाही शिल्लक नाही का? असे कडू म्हणाले.

काय आहे प्रकरण?

गृहमंत्री अमित शाह यांची सभा घ्यायचीच असे भाजपच्या नेत्यांनी सांगितले, तर भाजप सत्तेचा वापर करून अमरावतीचे सायन्स स्कोअर मैदान ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत, असा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. त्यांनी प्रहारची 24 एप्रिल रोजी सायन्स स्कोअर मैदानावर सभा होईल, असे स्पष्ट करत 23 एप्रिलपासून आम्ही ते मैदान ताब्यात घेऊ, असेही त्यांनी सांगितले.

यासाठीची प्रहारने बुकिंग केली आहे. मैदानासाठी आम्ही 18 तारखेला पैसे भरले. याचा पुरावाही कडू यांनी दाखवला. प्रशासनातील अधिकारी प्रहारच्या कार्यकर्त्यांना फोन करत धमकावित आहेत. लोकसभा निवडणूक सुरू असताना निःपक्षपणे प्रशासनाने काम करण्याची गरज आहे. पण, तसे होत नाही. याचे परिणाम गंभीर असतील, असेही बच्चू कडू (Bachchu kadu) यांनी स्पष्ट केले.

पोलिसांची भूमिका काय?

अमित शाह (Amit Shah) यांची 24 एप्रिल रोजी अमरावतीच्या भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी सभा होत आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कडू यांची सभा रद्द करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT