BJP Anup Dhotre News Sarkarnama
विदर्भ

BJP Anup Dhotre News : निकालाआधीच अनुप धोत्रे 'खासदार'? उतावळ्या समर्थकांची अतिघाई; अकोल्यात 'बॅनरबाजी'!

Deepak Kulkarni

योगेश फरपट-

Akola News : सलग पाचव्यांदा अकोला लोकसभा हा गड अभेद्य ठेवण्यासाठी भाजपने विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिली होती.त्यांनी यापूर्वी कोणतीही निवडणूक लढविलेली नसून ही त्यांची पहिलीच निवडणूक आहे. अकोल्यात भारतीय जनता पक्षाचे अनुप धोत्रे,काँग्रेसचे अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यात मुख्य लढत आहे.पण धोत्रेंच्या समर्थकांचा उतावीळपणा समोर आला असून निकालाआधीच अनुप यांच्या खासदारकीचा उल्लेख असलेले बॅनरबाजी अकोल्यात करण्यात आली आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे (भाजप) उमेदवार अनुप धोत्रे यांचा निवडणूक निकालाआधीच खासदार म्हणून घोषीत करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. २४ मे रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप पदाधिकाऱ्यांनी शहरात काही ठिकाणी पोस्टरबाजी करून आपला अतिउत्साहाचे दर्शन घडवले आहे.

अनुप धोत्रे (Anup Dhotre) हे खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र असून यावेळेस त्यांनी अकोला लोकसभेची निवडणूक लढवली. 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. निकालाची सर्वांनाच उत्कंठा लागली आहे. दरम्यान, भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांचा शुक्रवारी (ता. 24) वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात अनेक ठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. यामध्ये भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी अनुप धोत्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खासदार म्हणून संबोधले आहे.

याआधी सुद्धा एका शासकीय कार्यालयात आयोजित बैठकीला सुद्धा ते उपस्थित झाले होते. अद्याप निकाल बाकी असून भाजप आणि उमेदवाराकडून अशाप्रकारे आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे दिसते. राजकीय वर्तुळात याची चांगली चर्चा रंगली आहे. आदर्श आचारसंहिता सुरु असताना थेट सार्वजनिकपणे खासदार म्हणून भाजप उमेदवाराचा प्रचार आणि शुभेच्छा दिल्या जात आहे. निवडणूक विभाग भाजपचे आक्रमण व हुकूमशाहीने सुस्त पडला आहे. तो फक्त इतरांवर कारवाईसाठी असल्याचे एकंदरीत चित्र आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एवढी घाई कशासाठी?

अकोला लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून अनुप धोत्रे, महाविकास आघाडीकडून डॉ. अभय पाटील तर वंचित बहुजन आघाडीकडून ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यात थेट लढत झाली आहे. निवडणुकीचा निकाल सुद्धा अनपेक्षित लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. पण निकालाआधीच खासदार म्हणून पोस्टरबाजी कशासाठी? असा प्रश्न यानिमित्ताने नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

निवडणूक आयोग कारवाई करणार का ?

आचारसंहिता सुरु असताना हा प्रकार होत असून त्याकडे निवडणुक विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे. अनुप धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खासदार म्हणून दाखविण्याची अतिघाई त्यांच्या समर्थकांना झाली असल्याचे दिसून येत आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT