Nagpur News : पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कृष्णा खोपडे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार अशीच चर्चा मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी रंगली होती. ते सलग चारवेळा निवडून आले आहेत. यावेळी त्यांनी विदर्भातून सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. यामुळे त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते खास मुंबईत सत्कार करण्यात आला होता. मात्र, त्यांच्या वाट्याला यावेळीसुद्धा उपेक्षाच आली. आता त्यांना नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त करून भाजपने लाल दिव्याऐवजी महत्त्वाचे पद दिले आहे.
नागपूर शहराचा विकास आणि नियोजनासाठी ब्रिटीश काळात नागपूर सुधार प्रन्यासची स्थापना करण्यात आली आहे. नागपूर महापालिकेच्या स्थापने नंतर ही संस्था बरखास्त करणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. एकाच शहरात दोन दोन विकास प्राधिकरण असल्याने प्रन्यासला बरखास्त करावे अशी मागणी केली जात आहे. भाजपच्या अजेंड्यावर हा विषय आहे.
युती सहकार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना प्रन्यासच्या बरखास्तीचा निर्णय घेण्यात आला होता. टप्प्याटप्प्याने बरखास्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच काँग्रेसने हा निर्णय फिरवला. प्रन्यासला पुन्हा अधिकार बहाल केला.
आता पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार आले आहे. भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी पहिल्या हिवाळी अधिवेशनात आणि आता सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात सुधार प्रन्यास बरखास्त करण्याची मागणी केली आहे. प्रन्यास बरखास्त करण्याच्या मागणी स्वतः कृष्णा खोपडे (Krushna Khopade) यांनी भाग घेतला आहे. त्याच सुधार प्रन्यासवर त्यांची विश्वस्त म्हणून सरकारने नियुक्ती केली आहे.
नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्तपद अतिशय महत्त्वाचे मानले जाते. लोकप्रितिनीधी म्हणून आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी प्रन्यासचा आजवर प्रामुख्याने राजकीय नेत्यांनी वापर केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत मंत्रिमंडळात असताना त्यांनी विश्वस्तपद आपल्याकडे ठेवले होते.
यावरून याचे महत्त्व लक्षात येते. कृष्णा खोपडे हे जॉयंट किलर म्हणून ओळखले जातात. पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातील हा एकेकाळी काँग्रेसचा गड समजला जात होता. तो खोपडे यांनी उध्वस्त केला आहे.
काँग्रेसचे दिग्गज नेते सतीश चतुर्वेदी या गडाचे राजे होते. त्यावेळी खोपडे साधे नगरसेवक होते. भाजपकडून त्यांच्याविरोधात कोणी लढण्यास इच्छुक नव्हते. भाजपने खोपडे यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. सतीश बाबू विजय निश्चित झाला असेच मानले जात होते. मात्र, खोपडे यांनी इतिहास घडवला. सतीश बाबूंना त्यांनी पराभवाचा धक्का दिला.
त्यानंतर खोपडे हेच या गडावर विराजमान झाले आहे. 2014च्या निवडणुकीत भाजप-सेनेची सत्ता आल्यानंतर खोपडे यांनी नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्यासाठी आपला पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघ सोडण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती. हा राजकीय उतावीळपणा त्यांना भोवला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.