Congress , BJP  Sarkarnama
विदर्भ

BJP vs Congress politics: भाजपकडून काँग्रेसचा मोठा गेम; भावी नगराध्यक्षालाच लावले गळाला

Maharashtra political News : नगरपालिका आणि नगर पंचयतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायच्या एक दिवस आधी भाजपने काँग्रेसचा मोठा गेम केला.

Rajesh Charpe

Nagpur News : नगरपालिका आणि नगर पंचयतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायच्या एक दिवस आधी भाजपने काँग्रेसचा मोठा गेम केला. मौदा नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार राजाभाऊ तिडके यांना आपल्या गळाला लावले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिकडे यांचे ते चिरंजीव आहेत. यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

नागपूर जिल्ह्यात काँग्रेसच्या (Congress) नेत्यांमध्ये बाबूराव तिडके मोठे नाव आहे. अनेक शाळा, कॉलेजचे जाळे तिडके यांनी नागपूर जिल्ह्यात उभे केले आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या ते अत्यंत जवळच होते. राजकीय आणि आर्थिक सोयीसुविधा उपलब्ध असतानाही तिडके यांना राजकारणात मोठी उंची गाठता आली नाही. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचे राजकीय अस्तित्वही धोक्यात आले होते.

राजाभाऊ तिडके पंधरा वर्षांपासून रामटेक विधानसभा मतदारसंघावर दावा करीत होते. मात्र शेवटपर्यंत त्यांना तिकीट मिळाले नाही. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, माजी अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी या मतदारसंघात तयारी केली होती. त्यांचे तिकीट फायनल मानले जात होते. त्यावेळी तिडके यांनीसुद्धा आपली दावेदारी दाखल केली होती. मुळक यांच्या नावाला विरोध केला होता. स्थानिकांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती. मात्र केंद्रातून सूत्र फिरले. मुळक आणि तिडके दोघांचेही तिकीट कापण्यात आले. गज्जू यादव यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

यादव तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. पराभवानंतर ते भाजपमध्ये (BJP) दाखल झाले. २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा मुळक आणि तिडके यांची नावे चर्चेत आली आहेत. मात्र, रामटेक विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे सेनेसाठी सोडला. त्यामुळे मुळक यांनी बंडखोरी केली. तिडके यांनी निवडणूक लढण्याचा विचार सोडून दिला. भाजपमध्ये प्रवेश घेऊन त्यांनी मौदा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदावर दावा केला असल्याचे दिसून येते.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत राजाभाऊ तिडके आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनाच नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली जाणार असल्याचे बघून मौदा नगर पालिका क्षेत्रीतल भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोष उफाळून आला आहे. तिकडे यांच्यामुळे भाजप आणखी बळकट होईल, असा दावा भाजपच्या नेत्यांनी केला आहे तर तिडके यांनीसुद्धा माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाची प्रचिती भाजपला येईल, असे मत व्यक्त केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT