Uddhav Thackeray vs Prataprao Jadhav  Sarkarnama
विदर्भ

Uddhav Thackeray: ठाकरेंनी घेतलं मनावर; प्रतापराव जाधवांचा करेक्ट कार्यक्रम करणार म्हणजे करणारच..! उमेदवारही फायनल

Deepak Kulkarni

Buldhana Political News : लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत.त्यामुळे सत्ताधारी महायुतीसह महाविकास आघाडीतही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.एकीकडे महायुतीने 48 पैकी 45 जागा जिंकणार असल्याचा दावा केला जात आहे. तर महाविकास आघाडीसमोर विरोधकांची मोट बांधत महायुतीला धक्का देण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावत आहे.

याचबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी कंबर कसली आहे.महाविकास आघाडीचे जागावाटपावरुन अद्याप जरी भिजत घोंगडे असले तरी ठाकरेंनी मात्र आपले उमेदवारही ठरवण्यास सुरुवातही करुन टाकली आहे. आता आपला दुसरा उमेदवारही जाहीर केला आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेत असलेल्या प्रतापराव जाधव यांनी आमदारकी आणि खासदारकी दोन्हींची हॅटट्रिक केली आहे.बुलढाणा लोकसभा मतदारसंघात त्यांचा चांगलाच दबदबा राहिला आहे. जाधव हे शिवसेनेतील मातब्बर नेत्यांपैकी एक आहेत.बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले अन् कडवा शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे प्रतापरावांनी बंडावेळी ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' करत थेट शिंदेंना साथ दिली.आता याच जाधवांविरोधात ठाकरेंनी आपला उमेदवार जाहीर केला आहे.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे 21 आणि 22 फेब्रुवारीला बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत.याच पार्श्वभूमीवर बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची बैठक ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत 'मातोश्री'वर गुरुवारी(ता.8) पार पडली.या बैठकीमध्ये संपर्कप्रमुख जिल्हाप्रमुख,तालुकाप्रमुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीत शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधवांविरोधात नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत ठाकरेंनी दिले आहेत.खेडेकरांच्या अधिकृत उमेदवारीची घोषणा ठाकरे बुलढाणा दौऱ्यावेळी करणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जिल्हा परिषद अध्यक्ष, शिवसेना जिल्हाप्रमुख तर आता बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.त्यामुळे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी ठाकरेंनी या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून नरेंद्र खेडेकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित केल्याची माहिती समोर येत आहे.

आगामी लोकसभा निवडणूक भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीत लढणार आहेत. युतीत हा मतदारसंघ शिवसेनेलाच सुटणार आहे. सध्यातरी जाधव यांच्याच उमेदवारीची चर्चा आहे. तर महाविकास आघाडीत बुलढाणा मतदारसंघ (Buldhana Loksabha Constituency) ठाकरे गटाला सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे विरुद्ध शिंदे गट अशीच लढत होण्याची शक्यता आहे.त्यामुळे ठाकरे गटाने याच दिशेने तयारी सुरू केली आहे.

2009, 2014 आणि 2019 अशा सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये प्रतापराव जाधव विजयी झाले.त्यामुळे विदर्भातील प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. खासदार जाधव यांनी अगदी सरपंचपदापासून सुरुवात करीत खासदारकीपर्यंतची झेप घेतली आहे. मेहकर तालुक्यातून त्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली. त्यानंतर प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. 1995 मध्ये ते पहिल्यांदा मेहकर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. नंतरच्या काळात त्यांनी मेहकरमध्ये आपला दबदबा वाढवत नेला.

2009, 2014 आणि 2019 अशा सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये प्रतापराव जाधव विजयी झाले.त्यामुळे विदर्भातील प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. खासदार जाधव यांनी अगदी सरपंचपदापासून सुरुवात करीत खासदारकीपर्यंतची झेप घेतली आहे. मेहकर तालुक्यातून त्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली. त्यानंतर प्रतापराव जाधव यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. 1995 मध्ये ते पहिल्यांदा मेहकर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. नंतरच्या काळात त्यांनी मेहकरमध्ये आपला दबदबा वाढवत नेला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT