Girish Mahajan & Eknath Shinde Sarkarnama
विदर्भ

Chandrashekhar Bawankule : काश्मीरला एकनाथ शिंदे, गिरीश महाजन वेगवेगळे गेले, महायुतीत वाद? खरं काय ते चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं

Chandrashekhar Bawankule Eknath Shinde Girish Mahajan Visit Kashmir : महायुतीमधील तीनही पक्षाचे नेते एकत्रितपणे काम करीत आहे. याचे कदाचित विरोधकांना दुःख वाटत असेल, असा असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला

Rajesh Charpe

Chandrashekhar Bawankule News : काश्मीरमध्ये पर्यटनाला गेलेल्या पर्यटकांवर पहेलगाम येथे अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर संपूर्ण देश हादरला आहे. महाराष्ट्रातील पर्यटकांना विशेष विमानाने मुंबईत आणले जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने गिरीश महाजन यांना काश्मीरला पाठवले होते तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेसुद्धा पाठोपाठ काश्मीरला गेले. दोघांनीही स्वतंत्रपणे पर्यटकांच्या भेटी घेतल्या. घाबरलेल्या पर्यटकांना दिलासा दिला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचा आरोप केला होता. यास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पर्यटकांना सुखरूप आणण्याच्या प्रयत्नाला कोणी श्रेयवाद म्हणत असेल तर दुर्दैवाची बाब आहे. यात राजकारण करणे योग्य नाही,असे प्रत्युत्तर दिले.

श्रेयवादाचा प्रश्नच नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री या नात्याने गिरीश महाजन यांना तातडीने काश्मीरला रवाना केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेसुद्धा श्रीनगरला जाऊन पर्यटकांशी भेटले. ते शिवसेना पक्षाचे नेते म्हणून गेले. यात राजकारण कुठे आले? असा सवाल बावनकुळे यांनी केला. श्रीनगरला देशाचे गृहमंत्री अमित शहासुद्धा तातडीने गेले आहेत. जास्त व्हीआयपी मुव्हमेंट तिथे होऊन प्रवाशांना त्रास होऊ नये जास्त लोकांना पाठवले नाही. यात कुठल्याही श्रेयवादाचा आणि राजकारण प्रश्नच उद्‍भवत नसल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

यात राजकारण नाही...

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काश्मीरला जाऊन महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांना सांभाळले. त्यांना धीर दिला. महाराष्ट्रात परत आणण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली. पहेलगाममधील दहशवादी घटना देशासाठी घातक अशीच आहे. अतिरेक्यांना धडा शिकवा अशी सर्वांचीच मागणी आहे. यात राजकारण करणे योग्य नाही. महायुतीचे तिन्ही नेते एकत्रितपणे काम करत आहे असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

महायुतीमध्ये एकी

'महायुतीमधील तीनही पक्षाचे नेते एकत्रितपणे काम करीत आहे. याचे कदाचित विरोधकांना दुःख वाटत असेल' असा असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला. पहेलगाम येथे पर्यटकांवर फायरिंग झाल्याचे कळताच राज्य शासनाने तातडीने पुढाकार घेतला. आपल्या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. आतापर्यंत श्रीनगर ते मुंबई विमानाच्या दोन खेपा झाल्या. आणखी विमानाची व्यवस्था केली जात आहे, असे बावनकुळेंनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT