Sanjay Gaikwad News : Sarkarnama
विदर्भ

Sanjay Gaikwad : मुख्यमंत्र्यांच्या डॅशिंग आमदारावर फरार होण्याची वेळ; अटकेची शक्यता..

जयेश विनायकराव गावंडे

Buldhana News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांच्यावर विरोधकांकडून केलेल्या टिकेला वेगवेगळ्या शब्दात प्रत्युत्तर देणारे बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावरच आता फरार होण्याची वेळ आली आहे. न्यायालयाच्या एका प्रकरणात तारखेवर हजर न राहणे आमदार संजय गायकवाड यांना चांगलंच भोवल आहे. बुलडाणा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आमदार गायकवाड यांच्यासह १७ जणांवर वारंट जारी केला आहे. (Latest Marathi News)

या १७ जणांपैकी आता १४ जणांना अटक करण्यात आली होती आणि या सर्वांना जामीन देखील मिळाली आहे. मात्र आमदार संजय गायकवाड यांना आपल्यावरील अजामीनपात्र वारंट रद्द करण्यासाठी सोमवारी न्यायालयात हजर व्हावे लागणार आहे. मात्र सोमवारी पर्यंत त्यांच्यावर फरार होण्याची वेळ आली आहे.

सन २०१२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष दत्ता काकस आणि संजय गायकवाड यांच्या गटात जोरदार हाणामारी झाली होती. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले होते. हे प्रकरण बुलडाणा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल झाले. त्यानंतर २०१९ मध्ये संजय गायकवाड आमदार झाले.

दरम्यान हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आमदार संजय गायकवाड व त्यांच्या गटातील १७ जणांनी तारखांना हजर राहणे टाळले. त्यामुळे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. म्हेत्रे यांनी १९ ऑक्टोबर २०२३ रोजी या प्रकरणातील आमदारांसह १७ जणांचे अजामीनपात्र वॉरंट जारी केले. आता हे वॉरंट रद्द करण्यासाठी हजर झाल्यानंतर न्यायाधीशांनी सर्वांचे अजामीनपात्र वॉरंट कायम ठेवून १४ जणांना न्यायालयातच अटक करण्यात आली होती.

यानंतर १४ जणांची वॉरंट रद्द करून जामीन देखील मंजूर करण्यात आली आहे. मात्र आरोपींपैकी आमदार संजय गायकवाड यांना वारंट रद्द करण्यासाठी सोमवारी २७ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर व्हावे लागणार आहे. मात्र सोमवारी पर्यंत त्यांच्यावर फरार होण्याची वेळ आली आहे. आमदार गायकवाडांनी हजर होऊन वॉरंट रद्द न केल्यास त्यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान आमदार संजय गायकवाड न्यायालयात हजर झाल्यानंतर सोमवारी न्यायालय काय निर्णय घेणार आहे? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT