Cricketnama 2023  Sarkarnama
विदर्भ

Cricketnama 2023 : क्रिकेटच्या 'महासंग्रामा'ला सुरुवात; बोचऱ्या थंडीत नागपुरातील वातावरण तापलं

प्रसन्न जकाते

Nagpur News : पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी (नागपूर) : अलिकडच्या काळात महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. अशातच सकाळ माध्यम समूहाच्या ‘सरकारनामा’ने आयोजित केलेल्या ‘क्रिकेटनामा’ या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला राजकारण्यांमधील निकोप स्पर्धेचं आणि खिलाडूवृत्तीचं दर्शन होणार आहे. आतापर्यंत असा उपक्रम कधीही विदर्भात झालेला नाही. त्यामुळे क्रिकेटनामाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. आता ही उत्सुकता संपत आहे, असे गौरवोद्गार राज्याचे कौशल्य,रोजगार आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काढले.

मेकोसाबाग परिसरात असलेल्या पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी, मेथोडीस्ट हायस्कूलच्या प्ले-ग्राऊंड, श्यालोम स्पोर्ट्स ग्राऊंड परिसरात ‘क्रिकेटनामा’चे सोमवारी (ता. 11) थाटात उद्घाटन झाले. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) स्वागताध्यक्ष व माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके निमंत्रक असलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला भाजपचे माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, भाजप आमदार आमदार वसंत खंडेलवाल, माजी आमदार डॉ. आशिष देशमुख, ‘सरकारनामा’चे संपादक ज्ञानेश सावंत, ‘सकाळ’ विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक संदीप भारंबे आदी उपस्थित होते.

‘सरकारनामा’चे संपादक ज्ञानेश सावंत यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातील निकोप स्पर्धा जनतेला दिसावी यासाठी ‘सरकारनामा’ने यापूर्वीही ‘क्रिकेटनामा’चा (Cricketnama) पहिला सिझन घेतला होता. आता उपराजधानी नागपुरात दुसरा सिझन घेत असताना आनंद होत आहे. महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्राला मोठा इतिहास आणि परंपरेचा वारसा आहे. परंतु, अलिकडच्या काळातील राजकीय परिस्थिती पाहता नेत्यांमधील खिलाडूवृत्तीचं महाराष्ट्राला दर्शन घडविणं गरजेचं झालं होतं. त्यातून ‘क्रिकेटनामा’ नागपुरात घेण्याचं निश्चित झालं.

तसेच महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्राला मोठा इतिहास आणि परंपरेचा वारसा आहे. परंतु, अलिकडच्या काळातील राजकीय परिस्थिती पाहता नेत्यांमधील खिलाडूवृत्तीचं महाराष्ट्राला दर्शन घडविणं गरजेचं झालं होतं. त्यातून ‘क्रिकेटनामा’ नागपुरात घेण्याचं निश्चित झालं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोमवारी सायंकाळी स्पर्धेचं उद्घाटन झाल्यानंतर नागपूर शरद पवार (Sharad Pawar) लिजेंडस् आणि भाजप किंग्ज यांच्यातील सामन्याला प्रारंभ झाला. या सामन्याबरोबरच या स्पर्धेतील इतर लढतीही थरारक होणार आहे. एरवी टिका-टिप्पणीवरुन एकमेकांवर तुटून पडणारे राजकीय नेतेमंडळी क्रिकेटच्या मैदानावर विरोधी संघाना धोबीपछाड देण्यासाठी कंबर कसणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT