Valmik Karad-Dhananjay Munde  Sarkarnama
विदर्भ

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी सांगितले विधानसभेत गैरहजर राहण्याचे कारण...

Santosh Deshmukh Murder Case : मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतरही धनंजय मुंडे विधानसभेत आले नाहीत. नागपूरमध्ये असूनही ते अधिवेशनात का येत नाही, याबाबत राज्यात उलटसुलट चर्चा सुरू होत्या.

Rajesh Charpe

Nagpur, 20 December : मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतरही धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) विधानसभेत आले नाहीत. नागपूरमध्ये असूनही ते अधिवेशनात का येत नाही, याबाबत राज्यात उलटसुलट चर्चा सुरू होत्या. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनातील आरोपींना त्यांचा राजकीय वरदहस्त असल्याचा आरोपही विरोधकांमार्फत करण्यात आला. त्यांना वाचवले जात आहे, मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणीही करण्यात आली. त्यावर मुंडे यांनी आज आपले मौन सोडले. ते म्हणाले, ‘माझ्या सहकाऱ्याच्या संबंधात जर एखाद्या घटनेची चर्चा चालू असेल आणि त्या चर्चेचे उत्तर मुख्यमंत्री देणार असतील तर परंपरेनुसार मी सदनात उपस्थित राहणे अयोग्य आहे. याशिवाय दुसरे कुठलेच कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. =

संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या खून प्रकरणारवरून विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे, त्यानुसार देशमुख खूनप्रकरणी एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहे. त्यानंतर मुंडे यांनी त्या प्रकरणावर भाष्य केले आहे.

ते म्हणाले, आरोप करणे विरोधकांचे कामच आहे, ते बोलणारच आहेत. बीडच्या घटनेवर दोन दिवस चर्चा झाली. त्यामुवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देणार होते. मी सभागृहात उपस्थित राहिल्यास त्यांची अडचण होऊ शकते. आज फडणवीस यांनी या प्रकरणावर सविस्तर उत्तर दिले आहे. यातून दूध का दूध पाणी झाले आहे.

मी सुरुवातीपासून म्हणत होतो की हे घरातलं भांडण आहे. त्यातूनच सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली आहे. या प्रकरणात सगळ्यांच्या भावना तीव्र आहेत. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमलेली आहे. सोबतच न्यायालयीन चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे या घटनेमागे कोण आहे, काय काय घडले, घटनेच्या आदल्या दिवशी काय झाले, हे समोर येणारच आहे, असा दावाही मुंडेंनी केला.

मुंडे म्हणाले, संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींना मोकासुद्धा लावण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या निवेदनाने सर्वांचे समाधान झाले आहे. माझ्या नावावर सदनात जो आरोप करण्यात आला असला तरी पोलिस तपास करणार आहेत. त्यातून कोण आरोप आहेत, त्यामागचा सूत्रधार कोण आहे हे समोर येणारच आहे.

विरोधी पक्षातील आमदारांनी काय बोलावे हे मी सांगू शकत नाही. आरोप करणाऱ्यांनी वाल्मिक कराड नागपुरात कुठे आहेत, याची माहिती पोलिसांना द्यावी. ते आपले काम करतील. ज्यांनी कोणी निर्घृण हत्या केली आहे, त्या आरोपींना फाशी झाली पाहिजे, ही माझी भूमिका असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT