Maharashtra Politic's : महायुतीच्या खाते वाटपासंदर्भात कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचे मोठे भाष्य

Bharat Gogawle's big Statement :आमचे नेते एकनाथ शिंदे जी जबाबदारी आमच्यावर देतील, ती आम्ही स्वीकारायला तयार आहे. काम करणाऱ्या माणसाला कोणतंही खातं मिळालं, तर तो त्या खात्याला न्याय देऊ शकतो. राज्याचा मंत्री होणं ही सर्वांत मोठी बाब होती, ती एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केली आहे.
Bharat Gogawle
Bharat GogawleSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 20 December : महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होऊन सहा दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही खातेवाटप होऊ शकलेले नाही. सोमवारपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या सर्व प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकटेच उत्तरं देत आहेत, त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप कधी होणार, याची उत्सुकता संपूर्ण राज्याला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते तथा कॅबिनेट मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawle') यांनी खाते वाटपावर मोठे विधान केले आहे.

नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या (winter session) दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना मंत्री गोगावले यांनी महायुती सरकारच्या खाते वाटपाविषयी मोठे विधान केले आहे. महायुती सरकारचे आज किंवा उद्या खातेवाटप जाहीर होऊ शकतं. त्याबाबत काही काळजी करायचं कारण नाही. ते निश्चितपणे होईल, अशी आम्हाला खात्री आहे. त्यामुळे आज किंवा उद्या खातेवाटप होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

आमचे नेते एकनाथ शिंदे जी जबाबदारी आमच्यावर देतील, ती आम्ही स्वीकारायला तयार आहे. काम करणाऱ्या माणसाला कोणतंही खातं मिळालं, तर तो त्या खात्याला न्याय देऊ शकतो. राज्याचा मंत्री होणं ही सर्वांत मोठी बाब होती, ती एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केली आहे, असेही गोगावले यांनी स्पष्ट केले.

Bharat Gogawle
Santosh Deshmukh Murder Case : धनंजय मुंडे यांना कोण वाचवत आहे?

भरत गोगावले म्हणाले, आमच्या गोरगरिब, कष्टकऱ्याची एकच इच्छा होती. ती मंत्रिपद मिळाल्याने पूर्ण झाली आहे. त्यांना काय माहिती की, कोणतं खातं असतं किंवा काय असतं ते. आपला माणूस मंत्री व्हावं, एवढीच त्यांची इच्छा होती. ती एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केली आहे. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. खातं कोणतंही मिळालं तरी आम्ही काम करत राहू. जनतेने जी सत्ता महायुतीच्या हातात दिली आहे, त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू.

Bharat Gogawle
Sanjay Raut : तुमच्यावर टीका करतो; म्हणून आम्हाला शत्रू समजता का? : घराची रेकी होताच राऊत संतापले

संजय राऊत यांच्या टीकेवर बोलताना भरत गोगावले म्हणाले, संजय राऊत यांनी केलेल्या टीकेमुळेच आम्हाला विधानसभा निवडणुकीत एवढं मोठं यश मिळाले आहे. त्यांनी आमच्यावर टीका केली तरी आम्ही त्याबाबत कोणतेही प्रत्युतर देणार नाही. संजय राऊत जेवढे बोलले आहेत, त्याच्या उलट घडत गेलेले आहे. त्यामुळे त्यांच्या घरीची रेकी केली काय हे कोणाच्याही मनात ध्यानात नाही. ते जर बोलत असतील आणि त्याच्याविरोधात घडत असेल म्हणजे आमच्यासाठी चांगलं घडत असेल, तर आम्ही कशाला रेकी करू त्यांच्या घराची, असा उलट सवाल गोगावले यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com