Dharmrao Baba Atram : 2014 मधील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांना समर्थन दिले होते. त्यामुळे तेव्हा त्या निवडून आल्या, असे राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले. येत्या लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्याच (अजित पवार गट) वाट्याला येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सोमवारी (ता. 4) सकाळी नागपुरात धर्मरावबाबा पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, महायुतीमध्ये आमच्या जागांवर आमचा दावा कायम आहे. महायुतीतील वरिष्ठ नेते एकत्र बसल्यानंतर जागावाटपाचे चित्र स्पष्ट होईल. गडचिरोली आणि भंडारा-गोंदिया या दोन जागांची आमची मागणी कायम आहे. शेवटी निर्णय महायुतीचे नेते घेतील. वरिष्ठ नेत्यांचा जो काही निर्णय असेल, तो आम्हाला मान्य असेल.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
संपूर्ण महाराष्ट्रातून आपण यापूर्वी नऊ जागा मागितल्या होता, पण आता 10 जागा मागणार असल्याचे निश्चित झाले आहे. आता वाढलेली दहावी जागा कोणती आहे, हे निश्चित मला माहिती नाही. महायुतीच्या विदर्भातून सर्वच्या सर्व 10 जागा निवडून आणणार आहाेत. त्यामध्ये मी स्वतः गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून लढणार आहे. गडचिरोलीच्या जागेवर घड्याळाचाच उमेदवार विजयी होईल, असाही विश्वास धर्मरावबाबा आत्राम यांनी व्यक्त केला.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या भोवती सध्या लोकसभा निवडणुकीचे राजकारण फिरते आहे. यासंदर्भात विचारले असता, येत्या लोकसभा निवडणुकीत बारामतीइतकाच गडचिरोली लोकसभा मतदारसंघसुद्धा महत्त्वाचा आहे. तुम्ही लोकसभा लढल्यानंतर अहेरी विधानसभा मतदारसंघातून कोण, असे विचारले असता, तेथे नवीन पिढीला संधी देणार आहोत. जो कुणी उमेदवार अहेरी विधानसभा मतदारसंघातून निवडून येईल, त्याला आम्ही दिल्लीत बसूनही मार्गदर्शन करू शकतो आणि ही नवीन पिढी राज्यात अजित पवारांचे हात मजबूत करतील.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झालेली आहे. दुसरी यादीसुद्धा येत्या दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भाजपचे विरोधी सर्वच राजकीय पक्ष त्यांची यादी जाहीर होण्याची वाट बघत आहेत. यामध्ये विदर्भात सर्वांत जास्त उत्सुकता आहे, ती नागपूर आणि भंडारा गोंदियासाठी या दोन मतदारसंघांत काँग्रेस कुणाला मैदानात उतरवणार, याबाबत काहीही स्पष्टता नाही आणि उमेदवार म्हणून स्वतःसुद्धा अद्याप कुणी पुढे आलेले नाही. भंडारा-गोंदिया मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे हेविवेट नेते प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेवर पाठवल्यामुळे येथे भाजपचाच उमेदवार लढणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. येथेही माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके आणि विद्यमान खासदार सुनील मेंढे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. अशा परिस्थितीत धर्मरावबाबा आत्राम यांनी भंडारा-गोंदियावर राष्ट्रवादीचा दावा सांगितल्यामुळे तेथे नेमके होणार काय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.