Narendra Modi Sarkarnama
विदर्भ

BJP Politics : देशावर कर्ज किती? केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा; म्हणाले...

जयेश विनायकराव गावंडे

Buldhana Political News : आपल्या देशावर कर्ज किती, हा प्रश्नावर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड काहीशे संतापले होते. त्यावेळी त्यांनी 'पाहून सांगतो' असे म्हणत वेळ मारून नेली. आता मात्र त्यांनी 150 लाख कोटींचे कर्ज असले तरी भारत देश आर्थिक महासत्ता होईल, असा दावाच करून टाकला आहे.

बुलडाणा येथे विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमात राज्यमंत्री कराड यांनी सोमवारी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारतर्फे शहरी भागातील 18 व ग्रामीण भागातील 17 अशा एकूण 35 योजनांची माहिती, विकसित भारत संकल्प अभियानाद्वारे पोहचवली जात आहे.

देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या उद्देशाने जनजागृतीचा भाग म्हणूनही या यात्रेकडे पाहिले जात आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री कराड हे अभियान रथाची माहिती देण्यासाठी बुलडाणा येथे आले होते.

यावेळी डॉ. कराड (Bhagwat Karad) म्हणाले, 'आपला देश हा जगातील आघाडीची अर्थव्यवस्था आहे. भारताचा ‘जीडीपी’ अमेरिका, चीन यांच्यापेक्षा जास्त आहे. कोरोनानंतरही आपल्या देशाची आर्थिक भरारी कायम आहे. यामुळे आर्थिक व्यवस्थेत भारत जगात पाचव्या क्रमांकावर असल्याचा दावा त्यांनी केला. संकल्प यात्रा काही ठिकाणी अडविण्यात आली, परत पाठविण्यात आली.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी विकसित भारत संकल्प अभियान रथयात्रा नाशिक येथे गेली होती. त्यावेळी डॉ. भागवत कराड यांनी देशावर किती कर्ज आहे हे पाहून सांगतो असे म्हणाले होते. पत्रकारांनी थेट प्रश्न केल्याने त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. देशाचा विकास दर वाढला, पाच ट्रिलियनकडे वाटचाल होत असताना ‘देशावर कर्ज किती?’ या प्रश्‍नावर अर्थ राज्यमंत्री कराड काहीशे संतापले. त्यावर त्यांनी ‘पाहून सांगतो’, असे जुजबी उत्तर दिले होते. मात्र, कर्ज फेडण्याची क्षमता देशाकडे असल्याचे त्यांनी सोमवारी उत्तर दिले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT