Shivsena Flag  Srakarnama
विदर्भ

Shivsena News : एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराकडून केंद्रीय मंत्र्यावर आरोप; निवडणुकीत काम न केल्याचा ठपका

Political News : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराने केंद्रीय मंत्र्यावर गंभीर आरोप केले. निसटत्या मताने विजय मिळाल्याने निवडणुकीत काम न केल्याचा ठपका ठेवत शिवसेनेला घरचा आहेर दिला.

Sachin Waghmare

Mumbai News : विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. त्यामुळे सरकारस्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महायुती सरकारचा महायुती सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित ५ डिसेंबरला होणार आहे. निवडणुकीची मतमोजणी होऊन आठ दिवसाचा कालावधी लोटला असला तरी विजयाचे व पराभवाचे कवित्व अद्याप सुरूच आहे. त्यातूनच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराने केंद्रीय मंत्र्यावर गंभीर आरोप केले. निसटत्या मताने विजय मिळाल्याने निवडणुकीत काम न केल्याचा ठपका ठेवत शिवसेनेला घरचा आहेर दिला. (Shivsena News)

राज्यातील विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला. त्यामुळे त्या पराभवाचे खापर एकमेकावर फोडले जात आहे. बुलढाणा मतदारसंघात शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड अवघ्या 800 मतांनी विजयी झाले. मात्र हा कमी मताच्या फरकाने झालेला विजय त्यांच्या जिव्हारी लागला आहे. संजय गायकवाड यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप करीत शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे.

आमदार गायकवाड यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांचे नाव घेत आरोप केला. जाधव यांनी या निवडणुकीत माझे काम केले नाही, असा ठपका गायकवाडांनी ठेवला आहे. जाधव यांनी ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर तर भाजपचे आमदार संजय कुटे यांनी आमदार अनिल परब यांना फोन करून कट रचल्याचा, गौप्यस्फोट गायकवाडांनी केला.

गायकवाड म्हणाले, 'मी विधानसभा निवडणुकीत एकटाच लढलो अन कमी मतांच्या फरकाने विजयी झालो. माझ्याच पक्षातील केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मिलिंद नार्वेकर यांना फोन करून माझ्याविरुद्ध रविकांत तुपकर यांच्या ऐवजी जयश्री शेळके यांना उमेदवारी देण्यास सांगितले. त्यामुळे तुपकर यांची उमेदवारी पक्की होती. मात्र, जाधव यांनी फोन केल्यावर त्याठिकाणचा उमेदवार बदलला.'

दुसरीकडे भाजपचे आमदार संजय कुटे यांच्यावरही त्यांनी आरोप केला. त्यांनी अनिल परब यांना संपर्क करून माझ्या विरोधात जयश्री शेळके यांना उमेदवारी देण्याची शिफारस केली. माझ्याच विरोधात महायुती आणि माझ्या पक्षातील नेत्यांनी गद्दारी केली. याची लेखी तक्रार मी करणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत'

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. महायुतीला राज्यातील 230 जागांवर विजय मिळवता आला. मुख्यमंत्रिपदाबाबत सध्या खल सुरु असतानाच संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत, ही आमची इच्छा असल्याचे गायकवाड म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT