Nagpur, 14 December : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी माजी खासदार संभाजीराजे यांनी देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत इथल्या आमदाराला मंत्री करू नये, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नाव न घेता धनंजय मुंडेंबाबत केली होती. त्यावर माजी गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मोठे विधान केले आहे. देशमुख खून प्रकरणातील सर्व धोगेदोरे पोलिस तपासतील आणि या प्रकरणामागील जो सूत्रधार आहे, ज्याने कोणी हे कृत्य केले आहे, त्याला पोलिस नक्की शोधून काढतील, असा दावाही त्यांनी केला.
देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत इथल्या आमदाराला मंत्री करू नका, अशी माझही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना विनंती आहे. हे तुमच्या पक्षाचे लोक आहेत. तुम्ही नेहमी शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि फुले-आंबेडकरांचे नाव घेता. खऱ्या अर्थाने तुम्ही त्यांचे नाव घेत असाल तर इथल्या आमदाराला मंत्रिपद देऊ नये, अशी माझ्या एकट्याची भूमिका नसून बीडमधील सर्वसामान्य जनतेची भूमिका आहे, असे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले होते. त्यावर शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माजी मंत्री देसाई म्हणाले, एखाद्या खून प्रकरणात आरोपी सापडेपर्यंत इथल्या आमदाराला मंत्री करू नका, असे म्हणण्यापेक्षा आरोपी पकडायला ज्या काही यंत्रणा लावायच्या आहेत, त्या लावल्या पाहिजेत, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली असती तर ती अधिक योग्य ठरली असती.
कुठल्याही खून प्रकरणात सर्व यंत्रणा काम करत असतात. पोलिस प्रशासन तपासाचे सर्व मार्ग धुंडाळत असतात. मी सुद्धा अडीच वर्षे गृहविभागाचा राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. संतोष देशमुख खून प्रकरणतील सर्व धोगेदोरे तपासतील आणि या प्रकरणामागील सूत्रधार आहे, ज्याने कोणी हे कृत्य केले आहे, त्याला राज्याचे पोलिस नक्की शोधून काढतील, असा दावाही शंभूराज देसाईंनी केला.
मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्याबाबत गुप्तता!
मंत्रिपदाच्या फार्म्युल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेच अधिकृतपणे माहिती देतील. परवापासून हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारासाठी केवळ उद्याचाच दिवस आहे. या हिवाळी अधिवेशनासाठीच आम्ही सर्व आमदार नागपुरात दाखल झालो आहोत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.