Nagpur Assembly Building Sarkarnama
विदर्भ

Maharashtra Assembly Winter Session: महायुतीचे पहिले हिवाळी अधिवेशन किती आठवड्याचे

Maharashtra Political Session Mahayuti Winter Session Plans: महाविकास आघाडीकडे विरोधीपक्षनेता निवडण्यासाठी लागणारे संख्याबळ नसल्याने अधिवेशन एकाच आठवड्यात गुंडाळण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : महायुती सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाची जय्यत तयारी नागपूरमध्ये सुरू झाली आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात सुमारे दोन आठवड्याचे अधिवेशन घेण्यात येते. नव्या सरकारचे पहिलेच अधिवेशन राहणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडे विरोधीपक्षनेता निवडण्यासाठी लागणारे संख्याबळ नसल्याने अधिवेशन एकाच आठवड्यात गुंडाळण्यात येणार असल्याची चर्चा आहे. (Assembly Winter session News)

अधिकाऱ्यांना डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्व कामे आटोपण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यानुसार दुसऱ्या आठवड्यातच अधिवेशन बोलावण्यात येईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. तत्पूर्वी मंत्री आणि आमदाराच्या शपथविधीसाठी मुंबईत एक किंवा दोन दिवसांचे अधिवेशन घेण्यात येईल. यातच हिवाळी अधिवेशनाची (Winter session) तारीख जाहीर केली जाईल.

साधरणतः डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात 20 डिसेंबरपासून अधिवेशनला सुरुवात होईल आणि दहा दिवसांचा कालावधी राहील असे सांगण्यात येते. विधिमंडळ सचिवांकडून 9 डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाने तयारीला गती दिली आहे. युद्धपातळीवर काम करण्यात येत आहे. शासनाने मागील अधिवेशन काळातील कामांचे पैसेच अद्याप दिले नाहीत. कोट्यवधींचे बिल थकले आहे. त्याचाही कामावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विधिमंडळ सचिवालयाकडून 9 डिसेंबरची ‘डेडलाईन’ दिली असली तरी सत्ता स्थापनेला वेळ लागणार आहे. मुंबईत अधिवेशन झाल्यानंतर दहा दिवसांनी नागपुरात अधिवेशन होणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे त्यामुळे 16 डिसेंबरपासून सुरू होईल. ख्रिसमसचा उत्सव अनेकांना मुंबईत व गोव्यात साजरा करायचा असतो. त्यामुळे त्यापूर्वीच अधिवेशनाची सांगता होईल. त्यामुळे अधिवेशन एक आठवड्याचे असेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महायुती (Mahayuti) सरकार आपल्या पहिल्या अधिवेशनात काय घोषणा करतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोयाबीन, धान आणि कापूस हा विषय अधिवेशनात खास असतो. विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसच्यावतीने सोयाबीनचे भाव यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याचा फारसा परिणाम झाला नाही. असे असले तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची आश्वासन महायुती सरकारने दिले आहे.

लाडक्या बहिणांना एकवीसशे रुपये देण्यात येईल, असेही जाहीर केले आहे. महायुतीच्या शेवटच्या टप्प्यात अनेक संत महात्मे यांच्या नावाने महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता. हे मुद्दे अधिवेशनाच चर्चेला येण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT