गडचिरोलीचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी जाहीर केले की ते पाचव्यांदा आमदार निवडून आले असून, एक वर्षानंतर मंत्रीपद निश्चित मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन वर्षांनी मंत्री बनविण्याचे आश्वासन दिले असून, ते गडचिरोलीच्या विकासासाठी सतत सभा व बैठकांद्वारे जनतेशी संपर्क ठेवत आहेत.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी महायुती उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आणि जिथे शक्य असेल तिथे महायुती करणार, अन्यथा मैत्रीपूर्ण लढत देऊ, असेही स्पष्ट केले.
Gadchiroli, 27 October : आपण विधानसभेवर पाच वेळा निवडून आलो, त्यातील चार वेळा मंत्री झालो. आता पाचव्यांदा आपण निवडून आलो आहे. त्यामुळे पाचव्यांदाही मंत्री होणार, हे निश्चित आहे. त्यामध्ये काही किंतु, परंतु नाही. एक वर्षानंतर आपण मंत्री बनणार आहोतच, विश्वास गडचिरोलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी बोलून दाखवला.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार धर्मरावबाबा आत्राम (Dharmaraobaba Atram) यांनी मतदारसंघात बैठकांद्वारे तयारीस सुरुवात केली आहे. रविवारी झालेल्या त्यांच्या मेळाव्यास प्रचंड गर्दी झाली होती. त्या मेळाव्यात बोलताना आत्राम यांनी मंत्रिपदाबाबत भाष्य केले आहे.
ते म्हणाले, आमदार म्हणून मी पाच वेळा निवडून आलो आहे. त्यात चार वेळा मला मंत्रिपदाची संधी मिळालेली आहे. आता मी पाचव्यांदा निवडून आलो आहे. त्यामुळे पाचव्यांदा मंत्री (Minister) होणार, हे निश्चित आहे. वर्षभरानंतर आपण मंत्री बनणार, हे निश्चित आहे. मंत्री नसतानाही एवढी मोठी जनतेची ताकद आपल्या पाठीशी आहे. ती मंत्रिपदापेक्षा मोठी ताकद आहे. मंत्री असतानाही काही लोकांच्या पाठीशी एवढे लोक नसतात. पण, मंत्री नसतानाही आपल्याकडे एवढे लोक येत आहेत, हे महत्वाचे आहे.
महायुती सरकारचे मंत्रिमंडळ बनविताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘दोन वर्षांनी मंत्री बनवितो,’ असे आपल्याला सांगितले आहे. त्यानंतर आम्ही थांबलेलो आहोत. गडचिरोलीचा विकास झाला पाहिजे, एवढाच माझा मुद्दा आहे, त्या दृष्टीने सभा घेत आहे. आगामी निवडणुकीत जिल्हा परिषद आणि नगरपालिकांमध्ये महायुतीचा अध्यक्ष झाला पाहिजे. हीच आमची भावना आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, मै सागरसेभी गहिरा हू, तुम कितने कंकड फेकोंगे, चुन चून कर आगे बढूंगा मैं. तुम मुझको कब तक रोकेंगे. कोई मुझे रोक नही सकता, असे सांगून त्यांनी विरोधकांना चॅलेज दिले. ते म्हणाले, वन पट्ट्यात आपण गेली पन्नास वर्षांपासून शेती करत आहोत. मात्र, आपल्याला हक्काचे वनपट्टे अजून काही मिळालेले नाहीत. या कामासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो. लोकप्रतिनिधी झाल्यानंतर आपण बसून राहण्यापेक्षा लोकांची काम आपण करत राहिलो.
जिथं काम होतं, तिथं लोकं येतात. काम करणारी व्यक्ती महत्वाची असते. त्यादृष्टीने काल आमच्या सभेला अपेक्षापेक्षा जास्त गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. विदर्भात स्वबळावर लढायचे की महायुती करून याबाबत चर्चा करण्यासाठी मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आज जात आहे. उद्याच्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात व्यूहरचना करण्याबाबत चर्चा होणार आहे, असेही आमदार आत्राम यांनी नमूद केले.
जिथे शक्य आहे, त्या ठिकाणी महायुती केली पाहिजे, त्या ठिकाणाहून महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे, ज्याठिकाणी शक्य नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत लढू, असे धर्मरावबाबा आत्रम यांनी सांगितले.
1. धर्मरावबाबा आत्राम यांनी मंत्रीपदाबाबत काय म्हटलं?
ते म्हणाले की, “मी पाचव्यांदा आमदार झालो आहे, त्यामुळे पाचव्यांदा मंत्री होणार हे निश्चित आहे.”
2. अजित पवार यांनी आत्राम यांना काय आश्वासन दिलं?
अजित पवार यांनी त्यांना ‘दोन वर्षांनी मंत्री बनवितो’ असे सांगितले आहे.
3. आत्राम यांचा मुख्य भर कोणत्या मुद्द्यावर आहे?
त्यांनी गडचिरोलीच्या विकासावर आणि वनपट्ट्यांच्या हक्कासाठी लढण्यावर भर दिला आहे.
4. आगामी निवडणुकांबाबत त्यांची भूमिका काय आहे?
महायुती करून जिंकण्याचा प्रयत्न होईल; आणि जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत दिली जाईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.