Dharmaravbaba Atram Statement: धर्मरावबाबा आत्राम यांनी मंत्रिपदाबाबत केलं मोठं विधान अन् राजकीय चर्चांना आलं उधाण!

Dharmaravbaba Atram Big Statement on Ministerial Post: यापूर्वी त्यांनी मंत्रिपदासाठी अडीच वर्षे प्रतीक्षा करणार असल्याचे जाहीर केले होते, मात्र जाणून घ्या, आता त्यांनी काय भूमिका घेतली आहे?
Dharmaravbaba Atram’s statement about a potential ministerial post has triggered widespread political discussions and reactions in Maharashtra
Dharmaravbaba Atram’s statement about a potential ministerial post has triggered widespread political discussions and reactions in MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

Dharmaravbaba Atram Statement on Ministerial Post : आपण जेव्हा जेव्हा निवडूण येतो तेव्हा मंत्री होतो, असा दावा करणारे राज्याचे माजी अन्न व औषध प्रशासन मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातील प्रमुख नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी मंत्रिपदाची आशा सोडल्याचे दिसत आहे. यापूर्वी त्यांनी मंत्रिपदासाठी अडीच वर्षे प्रतीक्षा करणार असल्याचे जाहीर केले होते. आज मात्र त्यांनी कुणाला तरी मंत्रीपद मिळेल, मला आशा नाही असा नाराजीचा सूर आवळला. त्यावरून ते महायुती सरकारवर नाराज असल्याचे बोलले जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीच्या अडीच वर्षांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले होते. शरद पवारांना सोडचिठ्ठी दिल्याने लगेच त्यांच्या वाट्याला मंत्रीपद आले होते. गडचिरोली जिल्ह्यातून एकमेव मंत्री असताना त्यांनी पालकमंत्रिपदावर दावा केला नव्हता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री होते. फडणवीस आमचे नेते आहेत आणि गडचिरोलीच्या विकासासाठी ते पालकमंत्री आम्हाला हवे आहेत असे ते सांगत होते.

Dharmaravbaba Atram’s statement about a potential ministerial post has triggered widespread political discussions and reactions in Maharashtra
Triple Engine Government Delhi : दिल्लीत आता ‘ट्रिपल इंजन सरकार’ भाजपचाच महापौर ; काँग्रेसला निवडणुकीत अवघी आठ मतं!

दरम्यान घरगुती वादामुळे त्यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. भाजप गडचिरोलीवरचा दावा सोडेल असा शेवटपर्यंत त्यांना विश्वास होता. भाजपच्या बड्या नेत्यांच्याही त्यांनी लोकसभेची उमेदवारी द्यावी इच्छा होती. मात्र शेवटपर्यंत माजी खासदार अशोक नेते यांनी माघार घेतली नाही. केंद्रीय नेतृत्वात नेते यांनाच साथ दिली. त्यानंतर बाबा आत्राम यांनी पुन्हा आपल्या अहेरी विधानसभेकडे मोर्चा वळवला.

Dharmaravbaba Atram’s statement about a potential ministerial post has triggered widespread political discussions and reactions in Maharashtra
India-Pakistan Tensions : बुडत्याचा पाय खोलात! भारताने फास आवळताच भेदरलेल्या पाकिस्तानचा आत्मघातकी निर्णय!

२०२४च्या निवडणुकीत त्यांना मुलगी आणि पुतण्या या दोघांविरुद्ध लढावे लागले. शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या मुलीला उभे केले तर भाजपने मतदारसंघ सोडल्याने माजी राज्यमंत्री व बाबा आत्राम यांचे पुतणे अंबरीश आत्राम यांनी बंडखोरी केली होती. मात्र बाबा आत्राम दोघांनाही पुरून उरले. विजयी झाल्यानंतर बाबा आत्राम यांचे मंत्रीपद पक्के असेच समजले जात होते. बाबा आत्राम यांनाही तसेच वाटत होते. त्यांनी गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदावरसुद्धा दावा केला होता. मात्र अजित पवारांनी भुजबळासह अनेक मोठ्या नेत्यांना व माजी मंत्र्यांना धक्का दिला. यात आत्राम यांचाही समावेश आहे.

Dharmaravbaba Atram’s statement about a potential ministerial post has triggered widespread political discussions and reactions in Maharashtra
Persona Non Grata Note : भारताने पाकिस्तानच्या उच्च अधिकाऱ्यांना रातोरात बोलावून बजावली 'पर्सोना नॉन ग्राटा नोट'!

नाराजी टाळण्यासाठी अजित पवार यांनी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला जाहीर केला. त्यामुळे आत्राम यांनी अडीच वर्षे प्रतीक्षा करणार असल्याचे जाहीर केले होते. आज पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी विदर्भात राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या कमी आहे, त्यामुळे खातेसुद्धा कमी असल्याचे सांगितले. दोन वर्षानंतर बदलात राष्ट्रवादीचा कोणीतरी मंत्री होईल, असे सांगताना त्यांनी मला आशा नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र आल्यास चांगले होईल असेही मत व्यक्त केले. यात सर्वांचाच फायदा आहे असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागली असल्याचे त्यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com