Jacky Rawalani Bhandara 
विदर्भ

Bhandara Election: "‘फालतू' माणसाला भाजपात प्रवेश कसा?"; शिंदे सेनेचा संताप; बानवकुळेंनीच दिली होती उपाधी

Bhandara Election: अशा फालतू माणसाला माझ्याकडे आणू नका, असं बावनकुळे म्हणाले होते. आता त्यांनाच भाजपनं पक्षात प्रवेश दिला आहे.

Amit Ujagare

Bhandara Election: भंडारा जिल्ह्यातील शिवसेना पक्षाचे लोकसभा युवा प्रमुख जॅकी रावलानी याने नुकताच भाजपात प्रवेश केला. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला झाला. त्यामुळे शिवसेना चांगलीच संतापली आहे. काही दिवसांपूर्वी वाळू माफियाशी संबंध असलेल्या अशा फालतू माणसाला माझ्याकडे आणू नका असे सांगणाऱ्यांना नेत्यांना तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये रावलानी स्वच्छ झाले का? असा सवाल शिंदे सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केला. यावरून पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेतील वादाला सुरुवात झाली आहे.

नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भंडारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. भंडारा, साकोली, पवनी व तुमसर नगरपरिषदेवर झेंडा फडकविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. याकरिता मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू करण्यात आले आहे. शिवसेनेचे जॅकी रावलानी आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच भगवान बावणकर यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात महायुतीत मिठाचा खडा पडला असल्याचे दिसून येते. शिवसेना कार्यकर्ता फोडल्याने आमदार भोंडेकर चांगलेच संतापले आहेत.

भोंडेकर म्हणाले, "जॅकी रावलानी हे प्रत्येक निवडणुकीच्यावेळी मी पक्ष सोडतो असे सांगत होते. आम्हाला वाटले की यावेळी देखील ते असेच करतील. पण ते भाजप मध्ये गेले. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत.सहा महिन्यापूर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जॅकी रावलाणी हा वाळू माफिया आहे, असा फालतू लोकांना माझ्याकडे आणायचा नाही व स्वतः दूर राहायचा सल्ला मला दिला होता. पण आता त्यांनीच स्वतःच्या पक्षात रावलानी यांना प्रवेश दिला. त्यामुळे तो भाजपच्या वॉशिंगमध्ये स्वच्छ झाला का? असा टोला भोंडेकर यांनी लगावला.

तत्पूर्वी, आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हुकूमशाहीला कंटाळून व त्यांच्या अहंकाराला त्रस्त होऊन आपण भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला असल्याचा दावा दावा रावलानी यांनी केला आहे. भंडारा जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून भाजप नेते आणि आमदार भोंडेकर यांच्यात टोकाचे मतभेद झाले होते. शिवसेनेने या निवडणुकीत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्याशी हातमिळवणी केली होती. भंडारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मात्र भोंडेकर पुन्हा महायुतीत परतले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT