Jyanat Patil, shambhuraj desai  Sarkarnama
विदर्भ

jayant Patil News : जयंत पाटलांच्या फिरकीवर शंभुराज देसाईंची गुगली

Maharashtra politics News : जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा पर्यटन आणि खनिकर्म मंत्री शंभुराज देसाई यांना टोमणा मारला. मात्र तेवढच्या चपळतेने त्यांनी त्याला प्रत्युत्तर दिले.

Rajesh Charpe

Nagpur News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पन्नास आमदार घेऊन बाहेर पडले. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. आघाडीच्या नेत्यांना याची सल अद्यापही आहे. संधी मिळेल तेव्हा ते शिंदे सेनेच्या नेत्यांवर तुटून पडतात, टोमणे मारतात. आज जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा पर्यटन आणि खनिकर्म मंत्री शंभुराज देसाई यांना टोमणा मारला. मात्र तेवढच्या चपळतेने त्यांनी त्याला प्रत्युत्तर दिले.

आमचे नेते एकनाथ शिंदे (Eknath shinde) शब्दांचे पक्के आहेत. दिलेला शब्द पाळतात. त्यांनी आम्हाला सभागृहात आश्वासन देण्याचे पूर्ण अधिकारी दिले आहे. त्यांच्यावर असलेल्या विश्वासामुळेच आम्ही त्यांच्या नेतृत्वात 50 आमदार घेऊन बाहेर गेले, असे सांगून पाटलांना गप्प केले.

मुंबईतील रेल्वेच्या जागेवार वसलेल्या झोपड्या, झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन, रखडलेल्या प्रकल्पाच्या लक्षवेधीवर शंभुराज देसाई यांनी विधानसभेत उत्तर देत होते. त्यांनी सर्वांच्या सूचना ऐकून आपल्या दालनात बैठक बोलावतो आणि सर्व प्रकल्पांचा आढावा घेऊन मार्ग काढतो२, असे आश्वासन दिले. त्यावर जयंत पाटील म्हणाले, तुमच्या दालनात बैठक लावण्याचा तुम्हाला अधिकारच नाही. तुमचे खाते वेगळे आहे. गृहनिर्माण खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे आहेत. तुम्ही इकडे उत्तरे देतात तिकडे त्यांचा वेगळाच कार्यक्रम सुरू असल्याची मिश्किल टीका जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली.

यावर देसाई म्हणाले, आमची संयुक्त जबाबदारी आहे. शिंदे यांच्याकडे गृहनिर्माण खाते असले तरी त्यांनी आम्हाला पूर्ण अधिकार दिले आहेत. सभागृहात तुम्‍ही जे उत्तर द्याल, आश्वासने द्याल ती मी पूर्ण करीन असे त्यांनी सांगितले आहे. हे खोटे वाटत असले तर उद्धव ठाकरे सेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांना विचारा. माझ्याकडे खाते नसताना मी त्यांना दिलेले आश्वासन पूर्ण केले की नाही. यावर सभागृहातच सरदेसाई यांनी यास होकार दिला.

दुसऱ्या एका लक्षवेधीवर जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा शंभुराज देसाई यांची फिरकी घेतली. ते म्हणाले, 'लाडकी बहीण योजना आणि एकनाथ शिंदे यांना आमचा पाठिंबाच आहे. या योजनेमुळे तुम्ही सत्तेवर आला मात्र नुकसान शिंदे सेनेचेच झाले. लाडकी बहीण योजनेचा घोषणा केली तेव्हा एकनाथ शिंदे त्यावेळी एक नंबरचे नेते होते. आता ते दोन नंबरवर गेले आहे, असे पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT