shrikant shinde devendra fadnavis sarkarnama
विदर्भ

Kalyan Lok Sabha Election 2024 : श्रीकांत शिंदेंचं ‘कल्याण’ फडणवीसच करणार, बहुमताने निवडून आणणार

Devndra Fadnavis : भाजपकडून श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध असतानाच देवेंद्र फडणवीसांनी कल्याणचा उमेदवार जाहीर केला आहे.

Akshay Sabale

शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या लोकसभेच्या जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. हा वाद शुक्रवारी रात्री शिगेला पोहोचला. कारण कल्याणधील स्थानिक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी श्रीकांत शिंदे ( Shrikant Shinde ) यांच्याविरोधात ठाम भूमिका घेतली आहे. कल्याणची जागा भाजपला मिळायला हवी. ही जागा श्रीकांत शिंदे यांना सोडल्यास भाजपचा एकही कार्यकर्ता त्यांच्या मदतीसाठी प्रचारात उतरणार नाही, असा ठराव स्थानिक भाजपकडून मंजूर करण्यात आला होता. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी कल्याणचा उमेदवार जाहीर केला आहे.

श्रीकांत शिंदे ( Shrikant Shinde ) हे कल्याणधील शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार असतील, असं देवेंद्र फडणवीस ( Devendra fadnavis ) यांनी जाहीर केलं आहे. श्रीकांत शिंदे यांना भाजपकडून कुठेही विरोध नाही, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं. नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"भाजपकडून श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध नाही. श्रीकांत शिंदे हे कल्याणमधील शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार असतील. भाजप श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. पूर्ण ताकदीनं आणि गतवर्षीपेक्षा अधिक मतांनी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं, रासपा ही युती श्रीकांत शिंदेंना निवडून आणेल," असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी कल्याणमध्ये वैशाली दरेकर यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी कल्याणचा तिढा सोडवत श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना, अशी थेट लढत होणार आहे.

ठाकरे गटाकडून कल्याणमध्ये कोणात उमेदवार द्यायचा, याचा अभ्यास सुरू होता. गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्या नावाचा विचार ठाकरे गटाने केला होता. आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ), वरुण सरदेसाई ( Varun Sardesai ), सुषमा अंधारे ( Sushma Anadhare ) अशा बड्या नेत्यांच्या तसेच शिंदेंवर नाराज असलेले सुभाष भोईर, केदार दिघे ( Kedar Dighe ) यांच्या नावाची नंतर शक्यता वर्तविली जात होती.

पण, खुद्द भोईर यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती ठाकरे गोटातून आली आहे. यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभेत वैशाली दरेकर यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे लोकसभेला कोणाचं 'कल्याण' होणार, हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT