Loksabha Voting sarkarnama
विदर्भ

Loksabha Election 2024 : चंद्रपूरची ही १२ गावे करणार दोनदा मतदान; काय आहे कारण...

सरकारनामा ब्युुरो

Chandrapur News : तेलंगणातील आदिलाबाद लोकसभा मतदारसंघात आज चौथ्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. आणि यात मतदान करण्यासाठी रांगेत लागलेले हे मतदार आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील. याच मतदारांनी पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत मतदान केले आहे. महिनाभरात एकाच निवडणुकीत दोन वेगवेगळ्या मतदारसंघात मतदान करण्याचा चमत्कार घडला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती या दुर्गम तालुक्यातील साडेबारा गावे तेलंगणा सीमेला लागलेली आहेत. या गावांवर तेलंगणा आपला अधिकार सांगत आला आहे. पण ही गावे मूळ महाराष्ट्रात आहेत. दूरवर असलेली ही गावे नेहमीच विकासापासून, शासकीय योजनांपासून दूर राहिली आहेत.

याचा फायदा घेत तेलंगणा सरकारने या लोकांना रेशन कार्ड, मतदान पत्र, अंगणवाडी, शाळा, वीज अशा सुविधा देत आपल्याप्रती सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. येथील लोकांना स्वतःचा फायदा दिसत असल्याने ते दोन्ही राज्यातील योजनांचा लाभ उचलत आहेत.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

स्वस्त धान्य असेल, घरकुल योजना असेल किंवा इतर योजना असतील, याचा लाभ ते घेत आहेत. मतदानसुद्धा ते दोन्ही राज्यात करतात. तेलंगणातील प्रत्येक निवडणुकीत येथील लोक सहभाग घेतात. या साडेबारा गावात एकूण 5 हजार 117 मतदार आहेत. या प्रत्येकाकडे दोन मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, आधार आहे.

आज तेलंगणातील आदिलाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे. यात मतदान करण्यासाठी रांगेत लागलेले हे मतदार आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील. याच मतदारांनी पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत मतदान केले आहे.

Edited By : Umesh Bambare

सीमावर्ती साडेबारा गावे

येसापूर

अंतापूर

पद्मावती

इंदिरानगर

पलसगुडा

लेंडीगुडा

वेलापठार

नारायणगुडा

परमडोली

शंकरलोधी

महाराजगुडा

लेंडीजाडा

कोठा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT