Manoj Jarange Patil, Bacchu Kadu,  Sarkarnama
विदर्भ

Bacchu Kadu News : जरांगेंवर गंभीर आरोप करणाऱ्या बारस्करांची प्रहारमधून हकालपट्टी

Ajay Baraskar Maharaj Who Criticized Jarang Patil Was Expelled From Prahar : अजय महाराज बारस्कर प्रहारमधून बडतर्फ...

सरकारनामा ब्यूरो

Bacchu Kadu Amravati News :

मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या हेतूवर शंका उपस्थित करत अजय महाराज बारस्कर यांनी गंभीर आरोप केले. या आरोपांना Manoj Jarange Patil यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. मला आंदोलनातून बाजूला करण्याचा हा प्रयत्न असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. या वादानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष आणि नेते बच्चू कडू यांनी अजय महाराज बारस्कर यांच्यावर कारवाई केली आहे.

बच्चू कडू यांनी या संदर्भात अधिकृत पत्रक काढले आहे. या पत्रकातून आमदार कडू यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आंदोलन आणि आरक्षण विषयी कोणीही भूमिका मांडू नये. कडू यांनी प्रहारचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना हे आदेश दिले आहेत.

मराठा आरक्षणा विषयी बोलणारे अजय बारस्कर यांना प्रहार संघटना व प्रहार वारकरी संघटनेतून बडतर्फ करण्यात आले आहे. अजय बारस्कार यांची मराठा आंदोलना विषयीची भूमिका मान्य नाही. त्यांचे समर्थन प्रहार करत नाही. त्यासोबतच अजय बारस्कर यांचा आता प्रहार संघटनेशी संबंध नाही, असे बच्चू कडू यांनी पत्रकातून स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'तुकाराम महाराजांबद्दल अपशब्द'

'एवढ्या वर्षांनी समाज एकत्र झाला आहे. आपण काही बोललो तर विरोधकांना आयतं कोलीत मिळेल. हे सगळं तुमच्यावर येईल की तुम्ही समाज फोडला. म्हणून आम्ही आतापर्यंत गप्प होतो. पण जेव्हा जरांगे तुकाराम महाराजांना संत फंत बोलला, तेव्हा जरांगे संपला. तुकाराम महाराजांबद्दल अपशब्द काढले. तुकाराम महाराजांसाठी मी मरायलाही तयार आहे. यांनी मला गोळ्या घातल्या तरी चालेल. सामान्य किर्तनकार बारस्कर महाराजाने जीव दिला, असे बोलले जाईल. याचे मला समाधान असेल', असे म्हणत बारस्कार महाराजांनी जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केला.

'हा लोकांना फसवतोय'

'लोकांचे लक्ष आपल्याकडे कसे वेधले जाईल, प्रसिद्धी कशी मिळेल, हे जरांगेला पक्क माहिती आहे. कोणत्या रस्त्याने मुंबईला जाणार? असे पत्रकाराने विचारल्यावर जरांगे म्हणतो डांबरी रस्त्यावरून जाणार. याला कळत नाही. कोणत्या रस्त्यावरून म्हणजे कोणत्या मार्गाने. बीडवरून जाणार, पुण्यावरनं जाणार की नगरमधून, हे सांगता येईना त्याला (मनोज जरांगे पाटील). त्याला अक्कल नाही. आणि हा लोकांना फसवतोय', असा आरोप अजय बारस्कर यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT