Maratha Reservation News: राज्य सरकारने मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर केले. मात्र, 'सगेसोयरे' या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याबाबत कोणताही निर्णय न घेतल्यामुळे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा करण्याच्या तयारीत आहेत. यासंदर्भात बोलताना जरांगे पाटलांनी राज्य सरकारला इशारा देत आंदोलनाची तारीख ठरली तर मग माघार नाही, असं म्हटलं आहे.
'सगेसोयरे' या अधिसूचनेची राज्य सरकारने अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू केले आहे. मराठा आरक्षण विधेयक सरकारने आणले. मात्र,'सगेसोयरे' या अधिसूचनेची अंमलबजावणी का केली नाही ?, असा सवाल करत मराठा समाजाला दोन्ही आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत मंजूर करताना सभागृहात विरोधी पक्षातील नेत्यांना बोलू न दिल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच महाविकास आघाडीने राज्य सरकारला पत्र देत काही प्रश्न विचारले होते. यावर आता जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देत 'बोलू दिलं नाही, असं म्हणत आम्हाला येड्यात काढू नका. मराठा आमदारांनी मराठ्यांना येड्यात काढण्याचं काम करू नये', असा निशाणा त्यांनी साधला.
मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत मंजूर केले. मात्र, 'सगेसोयरे'या अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे मोटारसायकल दिली, पण पेट्रोल काढून घेतलं, अशी गत सरकारने केल्याचा निशाणा जरांगे पाटील यांनी साधला. तसेच मराठा समाजाचा आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा असताना सरकार निवडणुकाच घेऊ शकत नाही. आम्हाला 'सगेसोयरे' आरक्षण पाहिजे, असंही ते म्हणाले.
'एकदा आंदोलनाची दिशा ठरली तर माघार नाही. आमच्या आंदोलनाचे टप्पे असतात. आम्ही टप्प्याशिवाय आंदोलन करत नाही. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यातच सरकारला दणका बसणार आहे, आंदोलनाची दिशा ठरल्यानंतर माघार नाही', असा इशारा जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला दिला.
(Edited By-Ganesh Thombare)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.