Hivarkhed - Akola Sarkarnama
विदर्भ

Mitkari And Bharsakale : डबल इंजिनचा जोर लागल्यास नगरपरिषद झालेले हिवरखेड होणार तालुका !

Akola District : नागरिकांना आणखी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

जयेश विनायकराव गावंडे

Mitkari And Bharsakale : अकोला जिल्ह्यातील विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी आणि अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे या दोन्ही आमदारांकडे त्यांच्या समर्थकांनी व नागरिकांनी हिवरखेड नवीन तालुका निर्मितीची मागणी लावून धरली आहे. जर दोन्ही आमदारांनी आपल्या पूर्ण क्षमतेने शासन दरबारी जोर लावला तर हिवरखेड नवीन तालुका निर्मिती डबल इंजिनच्या गतीने होईल, अशी आशा जनतेला आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणाऱ्या हिवरखेड ग्रामपंचायतींचे नगरपरिषदेमध्ये रूपांतर झालं आहे. आता यानंतर हिवरखेड आणि परिसरातील नागरिकांना आणखी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हिवरखेड लवकरच तालुका होणार आहे. तालुका निर्मितीच्या प्रक्रियेला प्रशासनाकडून वेग आला आहे.

अकोला जिल्ह्यातील अकोट आणि तेल्हारा या तालुक्यांचे विभाजन होऊन हिवरखेड नवा तालुका लवकरच होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून हिवरखेडची ओळख होती. मात्र नागरिकांना शहरी सुविधा मिळाव्या, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीची नगरपरिषद व्हावी, यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेत. आंदोलने, मोर्चे काढून राजकीय नेत्यांच्या मागे लागून यश मिळालं आहे. तसा शासन आदेश निघाल्यानंतर ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपरिषद करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हिवरखेड आणि परिसरातील नागरिकांना दिलासा देणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. नगरपरिषदेची घोषणा होताच आता हिवरखेड तालुका होणार आहे. अकोट आणि तेल्हारा या दोन तालुक्यांचे विभाजन होऊन लवकरच तालुका निर्मिती होण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यातील हा सातवा तालुका असणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हिवरखेड तालुका व्हावा, अशी मागणी केली जात होती. अखेर या मागणीच्या कारवाईला प्रशासनाकडून वेग आला आहे. त्यामुळे लवकरच हिवरखेड तालुक्याची निर्मिती होण्याची शक्यता आहे.

भौगोलिक रचना, चाळीस हजारांवर लोकसंख्या, दळणवळणाची साधने, नागरिकांचा वेळ, श्रम, पैसा इत्यादींची बचत व्हावी, असे अनेक हेतू समोर ठेवून 2012पासून हिवरखेड तालुका निर्मिती महाराष्ट्र शासनाकडून प्रस्तावित आहे. त्यामध्ये अमरावती विभागातील एकूण दहा तालुक्यांचा समावेश होता. तर अकोला जिल्ह्यातील दोन नवीन तालुक्यांचा प्रस्ताव होता.

हिवरखेड या नवीन तालुक्याचा समावेश झाल्याने आता शासकीय स्तरावरून हिवरखेड तालुका निर्मितीच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अकोटच्या तहसीलदारांनी 5 मार्चपर्यंत आणि तेल्हारा तहसीलदारांनी 4 मार्चपर्यंत नागरिकांकडून आक्षेप व हरकती असल्यास लेखी स्वरूपात मागविले आहे. त्यानंतर कोणतेही आक्षेप व हरकती ऐकल्या जाणार नाहीत आणि पुढील कारवाई केली जाणार आहे.

अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू..

हिवरखेड विकास मंचचे संयोजक सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज आणि अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ हिवरखेडच्या पत्रकारांना अनेक वर्षांपासून शासकीय स्तरावर पत्रव्यवहार, मंत्र्यांना व अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने, तसेच माहिती अधिकार कायद्याचा पुरेपूर वापर करून, बातम्या प्रकाशित करून हा मुद्दा उचलून धरला आहे. हिवरखेड ग्रामपंचायतीचे तत्कालीन ते आतापर्यंतचे सर्व सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य आणि जागरूक नागरिकांनी मिळून ग्रामसभेचे ठरावसुद्धा पारीत केलेले आहेत. त्या सर्वांच्या मागणीला लवकरच यश मिळेल, अशी चिन्हे दिसत आहेत.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT