विदर्भ

Nagpur Winter Session : जेव्हा महाराष्ट्र गीत वाजेल, तेव्हा तुमची चिरकाल आठवण येईल!

प्रसन्न जकाते

Vidhan Bhavan : ‘मी आपला एकेकाळचा टोकाचा विरोधक! मात्र आपल्या विभागाची प्रचंड काम करण्याची, न्याय देण्याची पद्धत अत्यंत प्रभावी आहे.. 30 वर्षाचा संसदीय कामाचा अनुभव.. प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न अफलातून आहे... महाराष्ट्र गीत जेव्हा जेव्हा वाजत राहिल तेव्हा तेव्हा आपली चिरकाल आठवण राहिल.. पुढच्या अनंत पिढ्यांना..!’ क्षणाचाही विलंब न करता तत्काळ निर्णय घेणाऱ्या राज्यातील एका मंत्र्याला मिळालेल्या भाविक आभार पत्रातील हे शब्द आहेत.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे पार पडले. अधिवेशन काळात राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या व आपल्या विभागाच्या कामाचा वेग, सर्वांना समान न्याय देण्याची आपली आगळीवेगळी तऱ्हा, प्रशासनावरील पकड पुन्हा एकदा दाखवून दिली. त्यामुळे राज्यातील अनेक खासदार, आमदारांनी त्यांचे आभार व्यक्त करणाऱ्या अशा पत्रांनी कृतज्ञता व्यक्त केली.

नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले तेव्हापासून वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय या तीनही विभागांच्या अधिकाऱ्यांची ‘रोटेशन’ पद्धतीने तैनाती करण्यात आली होती. मंत्र्यांनी सभागृहात घोषणा केली की, जास्तात जास्त 30 मिनिटांत त्या विषयाचा तुकडा पडलाच पाहिजे, असा अलिखित नियमनच ठरला होता.

पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांच्या मतदार संघातील कचरा व्यवस्थापनाच्या विषयावर अवघ्या 15 मिनिटांत निर्णय झाला. शाहुवाडीचे आमदार विनय कोरे यांच्या मतदार संघातील वन विभागाचा एक मुद्दा त्यांनी सभागृहात मांडला. त्यावर एक तासात प्रधान सचिवांच्या उपस्थितीत बैठक होईल, असे मुनगंटीवार यांनी सभागृहात सांगितले. मंत्र्यांनी दिलेल्या वेळेपूर्वीच वन विभागाच्या प्रधान सचिवांसह सर्वच संबंधित वरिष्ठ अधिकारी विधान भवनातील दालनात हजर होते. घोषणेच्या अवघ्या 45 मिनिटांत बैठक सुरूही झाली व त्यात विषयाचा निकालही लागला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हत्तींचा उपद्रव पुन्हा सुरू झाला आहे. खासदार अशोक नेते यांनी यासंदर्भात वनमंत्री या नात्याने मुनगंटीवार यांचे लक्ष वेधले. तत्काळ त्यांनी बैठक घेतली. खासदार नेते यांच्या उपस्थिती हरीसिंग सभागृहातील बैठकीत नुकसानग्रस्तांना वाढीव मदती देण्याची सूचना देण्यात आली. वेकोलिच्या क्षेत्रातील बाधित गावांना दिलासा देण्याचा मुद्दाही तत्काळ सुटला.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदार संघालाही पुरातन विहिरीच्या कामासाठी 2.88 कोटी चुटकी चरशी मिळाले. काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे हे या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांनाही पत्रातून आभार व्यक्त करण्याचा मोह आवरला नाही. नऊ दिवसात या तीनही विभागांच्या 17 मॅराथॉन बैठकी विधान भवनात झाल्या.

विधान भवनात जणू सर्वच विभागांची शासन निर्णय व अधिसूचनांसाठी स्पर्धाच चालली होती की काय असे चित्र होते. संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी घोषणा केली की, तत्काळ त्याचे जीआर काढून ते ‘ड्रॉपबॉक्स’मध्ये टाकले जात होते. या ‘ड्रॉपबॉक्स’मध्ये सर्वांत आधी जीआर आणि अधिसूचना पडत होत्या त्या वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय विभागाच्या. कुटासा येथील प्रश्न मार्गी लागल्याने अकोल्याचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी सर्वांत आधी नमूद केलेले भावनिक शब्दांचा आधार घेत सुधीर मुनगंटीवार यांच्याप्रती आगळ्यावेगळ्या पद्धतीनेच आभार व्यक्त केले.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT