Harshawardhan Sapkal  sarkarnama
विदर्भ

Harshvardhan Sapkal : मुस्लिमांचा एवढाच कळवळा असेल तर हे करून दाखवा; हर्षवर्धन सपकाळांनी दिले भाजपला चॅलेंज

Harshvardhan Sapkale BJP challenge News : काँग्रेसने विकासाची कामे करताना त्याची फळे सर्व जाती धर्माला मिळावीत हेच पाहिले. भाजपावाले मुस्लीम समाजाची खूप काळजी असल्याचे दाखवत आहेत. अकोला येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात सपकाळ बोलत होते.

Rajesh Charpe

Akola News : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आक्रमक धोरण स्वीकारले आहे. भाजपवर ते थेट हल्लाबोल करीत आहेत. वक्फ सुधारणा विधेयक आणि तीन तलाक कायद्यावरून त्यांनी भाजपला चांगलाच टोला लगावला. भाजपला एवढचा कळवळा असले तर पक्षाच्या अध्यक्षपदी किंवा पंतप्रधान म्हणून मुस्लिम समाजाला संधी द्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

काँग्रेसचे आजपर्यंत 89 अध्यक्ष झाले, त्यात सर्व जाती धर्माचे, महिला, पुरुष, आदिवासी, एससी, एसटी, हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन धर्माचे नेते होते. काँग्रेसने विकासाची कामे करताना त्याची फळे सर्व जाती धर्माला मिळावीत हेच पाहिले. भाजपावाले मुस्लीम समाजाची खूप काळजी असल्याचे दाखवत आहेत. अकोला येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात सपकाळ बोलत होते.

मुस्लीम महिलांच्या हितासाठी तीन तलाक व गरिब मुस्लीमांसाठी वक्फ बोर्ड कायदा आणला हे भाजप (BJP) नेते सांगत आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची अध्यक्षपदाची मुदत संपलेली आहे. नरेंद्र मोदी हे सुद्धा 75 वर्ष पूर्ण करत आहे. त्यांना निवृत्तीचे वेध लागले असतील, रा. स्व. संघातून कोणाच्या नावाचे पाकीट येणार, त्यापेक्षा तुम्हीच एखाद्या मुस्लीम व्यक्तीला पंतप्रधान किंवा भाजपचा अध्यक्ष करा. सरसंघचालक मोहन भागवत यांनाही विश्रांती द्यावी व त्यांच्या जागी आदिवासी वा दलित समाजाच्या व्यक्तीला सरसंघचालक पदी बसवावे, असेही सपकाळ म्हणाले.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात नाहीत. सर्व सत्ता आपल्याच हाती हवी या हट्टापायी या निवडणुका होऊ दिल्या जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातील सर्व सत्ता तीन लोकच चालवत असून लुटारूंची रचना निर्माण केली आहे. शेतकऱ्यांची तूर बाजारात येण्याच्या आधीच त्याचे भाव पाडण्याचे काम मोदी सरकारने केले. दीडपड भाव दिले नाहीत पण शेतकऱ्यांचे कंबरडे मात्र मोडले, असेही सपकाळ (Harshvardhan Spakal) म्हणाले.

सरकारने अतिवृष्टीचे, गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे पैसे दिले नाहीत, ठेकेदारांचे पैसे दिले नाहीत, लाडकी बहिणीला पैसे देत नाहीत, एसटी कर्माचाऱ्यांना पगार मिळत नाही. राज्याचे नेतृत्व करणाऱ्या तिघांची नरेंद्र मोदींकडे पत असेल तर केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला विशेष पॅकेज आणून शेतकरी कर्जमाफी द्यावी व राज्याची आर्थिक घडी व्यवस्थित करावी. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेची अवस्था बिकट झाली असल्याचा आरोप यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT