Tuljapur Drug Case : तुळजापूर ड्रग्जप्रकरणी मोठी अपडेट; मुंबईपर्यतचे राजकीय कनेक्शन? तब्बल 10 हजार पानाचे आरोपपत्र

Tuljapur drug case update News : या प्रकरणी पोलिसांनी तपास करून तुळजापूर ड्रग्जप्रकरणी दहा हजार पानाचे आरोपपत्र दाखल केले आहे. या ड्रग्ज तस्करीमध्ये अनेक पेडलर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 MD Drugs Case
MD Drugs CaseSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता. या कारवाईत पोलिसांनी अडीच लाख रुपये किमतीचे 59 पुड्या ड्रग्ज जप्त केल्या. या प्रकरणात मुंबईपर्यतचे राजकीय कनेक्शन तपासात उघड होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून तुळजापूर ड्रग्जप्रकरणी दहा हजार पानाचे आरोपपत्र दाखल केले आहे. या ड्रग्ज तस्करीमध्ये अनेक पेडलर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या तस्करी प्रकरणात राजकीय कनेक्शन समोर आल्यानंतर आतापर्यंत 14 आरोपींना अटक करण्यात आली असून 21 आरोपी फरार आहेत. तुळजापूर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज तस्करीची मोठी चर्चा आहे. 15 फेब्रुवारी 2025 ला तुळजापूर तालुक्यात एमडी ड्रग जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात गेल्या दोन महिन्यांपासून अनेक उलगडे होत आहेत. लाखो भाविकांच्या तुळजापुरात ड्रग तस्करीमध्ये पुजारीच पेडलर असल्याचे समोर आले होते. दरम्यान, आता तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात दोषआरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

 MD Drugs Case
Shivsena UBT : शिवसेनाप्रमुखांच्या स्वप्नाला बळ देणाऱ्या 'कोकणातच' ठाकरे शिवसेनेला सुरुंग लागलाय...

धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयात तब्बल 10 हजार पानांचे दोषआरोपपत्र दाखल झाले आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात 35 आरोपी असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणातून भाजप (BJP) व शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याकडून एकमेकावर आरोप-प्रत्यारोप केल्याने राजकीय वातावरण तापले होते.

 MD Drugs Case
Bjp Kirit Somaiya black flags : बीडमध्ये नेमकं काय घडलं; किरीट सोमय्यांना मुस्लिमांनी दाखवले काळे झेंडे

या ड्रग्ज प्रकरणात 35 आरोपी असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तस्करी प्रकरणात राजकीय कनेक्शन समोर आल्यानंतरआतापर्यंत 14 आरोपींना अटक करण्यात आली असून 21 आरोपी फरार आहेत. ड्रग्ज तस्करीत कोणाची भूमिका काय राहिली आहे. याची नोंदणी दोषआरोपपत्रात नमूद करण्यात आली आहे. बँक ट्रांजेक्शन, आरोपींचा एकमेकांशी संपर्क कसा झाला दोषआरोपपत्रात नमूद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 MD Drugs Case
NCP-SP : आगामी 'स्थानिक'साठी रणनीती ठरली? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे महापालिकेसाठी चाचपणी सुरू

या ड्रग्ज प्रकरणातील आरोपी संगीता गोळे आणि इतर आरोपींचा संपर्क कसा झाला, आरोपींची साखळी कशी तयार झाली याबाबत दोषआरोपपत्रात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यात आरोपीचे जबाब, सीडीआरची माहिती तसेच मुंबई, सोलापूर, पुणे येथील तस्करी प्रकरणात संबंध असल्याची दोषारोपपत्रात माहिती आहे. या प्रकरणात काही राजकीय नेतेमंडळींचे लागेबांधे असल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणात भाजप व शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याकडून एकमेकावर आरोप-प्रत्यारोप केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

 MD Drugs Case
Maharashtra CM Pressure Tactics: मुख्यमंत्र्यांचे पुन्हा एकदा दबावतंत्र; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या खात्यांवर ठेवणार विशेष नजर?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com