Nagpur Winter session news  Sarkarnama
विदर्भ

Nagpur Assembly Session: विरोधकांनी वाढवला दबाव पण विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती नाहीच! उदय सामंतांनी दिले संकेत

Nagpur Assembly Session: दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नियुक्त करावा यासाठी विरोधकांच्यावतीने सातत्याने मागणी करून सरकारवर दबाव वाढवला जात आहे.

Rajesh Charpe

Nagpur Assembly Session: दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नियुक्त करावा यासाठी विरोधकांच्यावतीने सातत्याने मागणी करून सरकारवर दबाव वाढवला जात आहे. उद्धव ठाकरे यांनीसुद्धा आज विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांची भेट घेतली. अधिवेशन संपण्यापूर्वी विरोधी पक्षाची नियुक्ती केली जाईल अशी आशाही व्यक्त केली. मात्र, राज्याचे उद्योगमंत्री आणि शिंदे सेनेचे नेते यांच्या वक्तव्यावरून आणखी वर्षभर विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती होणार नसल्याचे स्पष्ट झाले.

विरोधी पक्षनेत्याच्या निवडीचा निर्णय विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती घेतात. उद्धव ठाकरे यांचा सेनेच्यावतीने कितीही दावा केला तरी भास्कर जाधव यांना ते विधानसभेचा विरोधी पक्षनेता करणार नाही. त्यांचा आग्रह आदित्य ठाकरे यांच्यासाठीच आहे. नागपूरच्या पुढील अधिवेशनापर्यंत तरी भास्कर जाधव विरोधी पक्षनेता होता होणार नाहीत असे सांगून उदय सामंत यांनी वर्षभर विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती होणार नाही याचे संकेत दिले.

उपमुख्यमंत्री हे पद संविधानात नाही. उपमुख्यमंत्र्यांना कुठलेही विशेषाधिकार नाहीत. ते एका खात्याचे मंत्री असून संविधानाच्या तरतुदीचे उल्लंघन आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देऊन उद्धव ठाकरे यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावरही बोलताना उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांनी आधी काँग्रेसशासित राज्यातील उपमुख्यमंत्र्यांचे राजीनाम्याची मागणी करावी असा सल्ला दिला.

कर्नाटक, तेलंगण, हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीची सत्ता असलेल्या राज्यांमध्येही उपमुख्यमंत्री आहेत याकडे सामंत यांनी लक्ष वेधले. ठाकरे यांना जेव्हा स्वतःच्या बाजूने निकाल लागतो तेव्हा चांगले वाटते. जेव्हा निकाल विरोधात जातात तेव्हा या स्वायत्त संस्थांवर ते टीका करतात. लोकसभा निवडणुकीत महाविकासआघाडीला यश मिळाले पण विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर ते ईव्हीएमला दोष देत आहेत. आता निवडणूक बॅलेटवर घ्या अशी मागणी करीत आहेत. मुंबईच्या बेस्ट पतपेढीच्या बॅलटवर घेतलेल्या निवडणुकीतही त्यांचा दारुण पराभव झाला. या निवडणुकीत १५ हजार मतांपैकी २ हजार मते देखील ठाकरेंना मिळाली नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदेंवर टीका करण्याचा प्रयत्न उबाठाने करु नये, असे मंत्री उदय सामंत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT