Nagpur News : महापालिकेच्या निवडणुकीत बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपने उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली. यात आजी-माजी महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती यांच्यासह एकूण 56 नगरसेवकांच्या तिकिटे भाजपने कापल्याने पक्षात मोठा असंतोष उफाळून आला आहे. यापैकी 2 नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाताला बांधले तर काही इच्छुकांनी दावेदारी दाखल करून भाजपला आव्हान दिले आहे.
दोन दिवसांपासून उमेदवारीसाठी भाजपकडे इच्छुकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. असंतोष टाळण्यासाठी भाजपने उमेदवाराला बोलावून एबी फॉर्मचे वाटप केले. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून ही सर्व प्रक्रिया सोमवारपासून सुरू केली होती. मंगळवारी दुपारी तीन वाजता सर्व उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर भाजपचे शिवसेनेला सोडलेल्या आठ जागांसह सर्वांची नावे जाहीर केली. भाजपने 151 पैकी 143 जागेवर उमेदवार उभे केले आहेत.
शिवसेनेच्या (Shivsena) कोट्यातील सहा जागेवरसुद्धा भाजपने एका माजी नगरसेविकेसह आपल्या कार्यकर्त्यांची नावे टाकली आहेत. तिकिटे कापण्यात आलेल्या प्रमुख नगरसेवकांमध्ये माजी सभापती अविनाश ठाकरे, सुधार प्रन्यासचे विश्वस्त संजय बंगाले, माजी महापौर नंदा जिचकार, माजी सभापती प्रवीण भिसीकर, अर्चना पाठक, हरीश ग्वालवंशी, अमर बागडे, परिणिता फुके, शिल्पा धोटे, प्रमोद कौरोती, उज्ज्वला शर्मा, लता काडघाये, सुमेधा देशपांडे, नेहा वाघमारे, सरला नायक
माजी उपमहापौर दीपराज पार्डीकर, यशस्वी नंदनवार, ज्योती भिसिकर, राजेश घोडपागे, वंदना यंगटवार, श्रद्धा पाठक, मनीष धावडे, अनिल गेंड्रे, जयश्री रारोकर, वैशाली रोहणकर, मनीषा कोठे, समिधा चकोले, वंदना भुरे, रेखा साकोरे, हरीश दिकोंडवार, स्वाती आखतकर, नीता मुळे, शीतल कांबळे, उषा पॅलेट, दीपक चौधरी, अभय गोठेकर, वंदना भगत, माधुरी ठाकरे, राजेंद्र सोनकुसरे, जयश्री वाडीभस्मे, माजी सभापती प्रकाश भोयर, लहुकुमार बेहते, सोनाली कडू, प्रमोद तभाने आदींचा समावेश आहे.
भाजपच्या माजी नगरसेविका स्नेहल बिहारे, भाजपचे (BJP) गणेश चर्लेवार, योगेश आणि कृतिका गोन्नाडे, मीना तरारे प्रतीक्षा चवरे यांना शिवसेनेसाठी सोडण्यात आलेल्या जागेवर उमेदवारी देण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.