Nagpur Politics : ठाकरेंच्या पक्षाला एक जागा देणार नाही! काँग्रेस आमदाराच्या आक्रमक बाण्याने महाविकास आघाडीला अखेरच्या क्षणी सुरुंग!

Nitin Raut Statement : नागपूरमध्ये काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एकही जागा न देण्याची ठाम भूमिका घेतल्याने महाविकास आघाडी तुटली असून राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे.
Congress MLA Nitin Raut speaks to the media in Nagpur as seat-sharing talks with Uddhav Thackeray’s Shiv Sena collapse, leading to the breakup of the Maha Vikas Aghadi alliance.
Congress MLA Nitin Raut speaks to the media in Nagpur as seat-sharing talks with Uddhav Thackeray’s Shiv Sena collapse, leading to the breakup of the Maha Vikas Aghadi alliance.Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur Mahapalika : कालपर्यंत काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेत जागा वाटपाची बोलणी सुरळीत सुरू असताना मंगळवारी (ता.30) मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी ताणून धरल्याने नागपूरमध्ये महाविकास आघाडी फुटली आहे. उत्तर नागपूरचे काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नितीन राऊत यांनी उत्तर नागपूरमध्ये उद्धव ठाकरेंच्या सेनेला एकही जागा देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. मला येथून विधानसभा लढावी लागते, त्यामुळे तुमचे तुम्ही बघा असे संगून त्यांनी जागा सोडण्यास नकार दिला. उत्तर नागपूरमधून ठाकरेंंच्या सेनेने 3 जागेची मागणी केली होती.

काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जागा वाटपाची बैठक रविवार पार पडली. या बैठकीत 12 जागा सोडण्याची तयारी काँग्रेसने दर्शवली होती. त्यावर ठाकरे सेना समाधानी नव्हती. किमान 18 जागा सोडाव्या अशी मागणी त्यांनी केली होती. याकरिता मागील निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांची आकडेवारी काँग्रेस नेत्यांसमोर ठेवली.

दुसऱ्या क्रमांकाची मते घेणाऱ्या जागा आम्हाला द्या अशी मागणी त्यांनी केली. यात प्रामुख्याने पूर्व नागपूर आणि मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील काही जागांचा समावेश आहे. पूर्व नागपूरमधून आमदार अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री यांनी शिवसेनेने (Shivsena) मागितलेल्या जागांवर आक्षेप घेतला.

Congress MLA Nitin Raut speaks to the media in Nagpur as seat-sharing talks with Uddhav Thackeray’s Shiv Sena collapse, leading to the breakup of the Maha Vikas Aghadi alliance.
Mahapalika Election : केशव उपाध्येंनी उमेदवारी मिळालेल्या भाजपच्या तरूण प्रवक्त्यांची नावे शोधली; यादीसह सोशल मीडियात केली ‘खास’ पोस्ट...

दुसरीकडे मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील ठाकरेंच्या सेनेचे पदाधिकारी किशोर पराते आणि काँग्रेस रमेश पुणेकर एकाच प्रभागात आल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षाने एका जागेसाठी ताणून ठेवले आहे.

Congress MLA Nitin Raut speaks to the media in Nagpur as seat-sharing talks with Uddhav Thackeray’s Shiv Sena collapse, leading to the breakup of the Maha Vikas Aghadi alliance.
NCP workers vandalism : राष्ट्रवादीच्या कार्यालयात तोडफोड; तिकिटं विकली, टीव्ही देखील फोडला...

मंगळवारी (ता.30) सकाळी पुन्हा एकदा काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे आणि उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठकीची एक फेरी पार पडली. मात्र यातही तोडगा निघाला नाही. शेवटी ठाकरेंच्या सेनेचे पदाधिकारी बैठकीतून बाहेर पडले. हे बघता महाविकास आघाडी तुटल्यात जमा झाली असल्याचे स्पष्ट होते. आता शिवसेनेने आपापल्या इच्छुकांना एबी फॉर्मचे वाटप करणे सुरू केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com