Former corporators from BJP, MNS, and BSP join Eknath Shinde's Shiv Sena in Nagpur, signaling a major political realignment.  sarkarnama
विदर्भ

Nagpur Shivsena Politics : नागपूरात शिंदेंच्या शिवसेनेकडून केवळ 'मविआ'लाच नव्हे, तर भाजप, मनसे अन् 'बसप'लाही धक्का!

Eknath Shinde Shivsena Sena in Nagpur : माजी उपमहापौर मालीकर यांच्यासह दहा माजी नगरसेवकांनी केला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Rajesh Charpe

Nagpur political news : महापालिका निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरातील माजी उपमहापौर रघुनाथ मालीकर यांच्यासह विविध पक्षांच्या दहा माजी नगरसेवकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत आणून राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी काँग्रेस, ठाकरे गट, पवार गटासह भाजप, मनसे अन् बसपा नेत्यांनाही मोठा धक्का दिला.

महापालिकेच्या निवडणुकीत नागपूरमध्ये महायुती एकत्रित लढण्याची शक्यता नसताना आणि शिवसेनेचे फारसे वर्चस्व नसताना, दहा माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये फक्त काँग्रेस, ठाकरे गट अन् पवार गटाच्याच नव्हे तर भाजप, बसपा अन् मनसेच्याही माजी नगरसेवकांचा समावेश आहे. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वात हे सर्वजण आज(सोमवार) शिंदेंच्या शिवसेनेते अधिकृतरित्या दाखल झाले. दोन महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नागपूर जिल्ह्यातील अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांना अद्यापही पदं वाटप करण्यात आली नाहीत आणि नियुक्तीपत्र दिले नसल्याने मोठी अस्वस्थता असताना यात आणखी नव्या कार्यकर्त्यांची भर पडली आहे.

रघुनाथ मालीकर ज्येष्ठ नगरसेवक आहेत. महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना ते उपमहापौर होते. माजी मंत्री व ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे ते कट्टर समर्थक आहेत. समीर मेघे भाजपचे आमदार असताना मालीकर यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिवसेनेत प्रवेश केलेल्य माजी नगरसेवकांमध्ये रघुनाथ, पुष्पा मालिकर (पवार गट), दिलीप मडावी( काँग्रेस), विठ्ठल हेडाऊ (काँग्रेस), लक्ष्मी बैतलवार (काँग्रेस), विकास नागभिडे (बहुजन समाज पार्टी), मोरेश्वर धोटे (मनसे), योगेश गोंडाणे, परसाराम बोकडे (ठाकरे गट), भास्कर बुरडे (ठाकरे गट), भिमराव मंदनवार (ठाकरे गट) दुर्गा रेहपाडे (भाजप), विमल पौणीकर (आदिम पक्ष) लक्ष्मी हेडाऊ (जनता दल), जिजा धकाते (कॅम्युनिस्ट पार्टी) यांचा समावेश आहे.

यांच्यासह काँग्रेस, पवार गट, बहुजन समाज पार्टी, ठाकरे गटाचे पदाधिकारी चक्रवर्ती रायबोले, आश्विन विंचूरकर, विकास आंबोरे, सिताराम शाहू, प्रभात वर्मा, नितीन काटेकर, विठ्ठल भोंगाडे, आतिश मदने, पंकज शेकोकर, कैलासिंग चौहान, आनंदसिंह पवार, शैलेससिंह मोर्य, दिलीपसिंह नायक, घनश्याम देऊळकर, राधेश्याम पराशर, मीनाक्षी चकोले, सुनील सेलोकर यांच्यासह अनेकांनी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते भगवे दुपट्टे घालून शिवसेनेत प्रवेश केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT