Voter List 
विदर्भ

Nagpur Voter List Scam: मतदार याद्यांमधील नावं परस्पर बदलली जाताहेत! नागपूरमध्ये ग्रामपंचायत सदस्याला बसला मोठा फटका

Nagpur Voter List Scam: मतदार याद्यांमधील घोळावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा याद्यांमध्ये घोळ असल्याचे मान्य केले आहे.

Rajesh Charpe

Nagpur Voter List Scam: मतदार याद्यांमधील घोळावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा याद्यांमध्ये घोळ असल्याचे मान्य केले आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांनी देखील जोपर्यंत याद्यांमधील घोळ दूर होत नाहीत तोपर्यंत स्थानिक निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. यात आता आणखी एका नव्या घोळाची भर पडली आहे. नागपूरमध्ये एका ग्रामपंचायत सदस्याचा मतदारसंघच परस्पर बदलण्यात आला आहे.

अनिल देशमुखांचा आरोप

राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी त्यांच्या काटोल विधानसभा मतदारसंघातील ग्राम पंचायत सदस्याचे नाव शेजाराच्या हिंगणा विधानसभा मतदार यादीत टाकल्याचे निदर्शनास आणून दिले. ही फेरफार राजकीय हेतूने करण्यात आली असल्याची शंका त्यांनी व्यक्त करून याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

स्वतःहून कोणताही अर्ज केला नाही

काटोल विधानसभा मतदारसंघातील कोंढाळी येथे संजय नत्थुजी राऊत हे वॉर्ड क्रमांक सहा येथे राहातात. ते २० वर्ष ग्राम पंचायत सदस्य होते. मात्र त्यांचे नाव आता हिंगणा विधानसभा मतदारसंघातील वानाडोंगरी गावाच्या मतदार यादीत टाकण्यात आले आहे. राऊत यांनी गाव सोडलेले नाही. आहे त्याच वस्तीत आणि घरात वास्तव्यास आहेत, त्यांनी स्वतः निवडणूक आयोगाकडं पत्ता बदलासाठी कुठलाही अर्ज केलेला नाही, असे असताना त्यांचे नाव एका मतदार यादीतून दुसऱ्या विधानसभा मतदारसंघाच्या यादीत कसे गेले? असा सवाल अनिल देशमुख यांनी केला.

पुन्हा निवडणूक लढवता येऊ नये म्हणून कारस्थान

त्यांच्या नावाने स्थलांतर करण्यासाठी ७ डिसेंबर २०२४ ला ऑनलाइन अर्ज करण्यात आला होता. त्यांच्या अर्जासोबत कुठलेही कागदपत्रे जोडले नाहीत. त्यांना कुठलीही नोटीस बजावण्यात आली नाही. त्यांच्या अर्जावर बीएलओची स्वाक्षरी नाही, असे असतानाही त्यांचे नाव कोंढाळीच्या यादीतून कमी करण्यात आले आणि हिंगणा विधानसभा मतदारसंघाच्या यादीत टाकण्यात आले. पंचायत समितीच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होण्याची शक्यता आहे. हे बघता त्यांना कोंढाळीतून पुन्हा निवडणूक लढता येऊ नये याकरिता कोणीतरी परस्पर त्यांचे नाव मतदार यादीतून काढून टाकल्याची शंका देशमुख यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT