Uddhav Thackeray, Chhagan Bhujbal Sarkarnama
विदर्भ

Uddhav Thackeray : देवा ! भुजबळांवर केली तशी कृपा सर्वांवर कर; उद्धव ठाकरेंचा भाजपला खोचक टोला

BJP Politics : भाजपचे हिंदुत्व थोतांड, ते मानायला तयार नाही

Sunil Balasaheb Dhumal

Nagpur Winter Session 2023 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनासाठी नागपूर येथे दाखल झाले आहेत. राज्यातील शेतकरी, कर्मचारी, रोजगारावरून ते सरकारवर सडकून टीका करताना दिसत आहेत. देशात ईडी, सीबीआय आणि आयटीच्या कारवाईतून भाजप विरोधकांना आपल्या गोटात सामील करून घेते. तसेच आता मंत्री छगन भुजबळांवर केली तशी कृपा सर्वांवर कर, अशा खोचक टोलाही ठाकरेंनी भाजपला लगावला आहे.

मंत्री छगन भुजबळ, अजित पवार गटासोबत सरकारमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यानंतर त्यांच्यावर असलेली तक्रार नेमकी काय आहे, हेच ईडी कशी काय विसरली, अशी खिल्ली ठाकरेंनी उडवली. ठाकरे म्हणाले, 'भुजबळांना अशी कोणती जडीबुटी मिळाली, कोणता असा चमत्कारिक साधूबाबा भेटला, की ईडी एकदम मागेच गेली. मागील सुनावणीत तर ईडीने आपण भुजबळांविरोधात कशासाठी केस केली होती, हेच माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे देवा, ही जडी बुटी सर्वांना दे, अशी माझी प्रार्थना आहे.'

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपने विरोधकांवर केलेल्या आरोपांचाही समाचार घेतला. ते म्हणाले, 'भाजपला वाटेल त्यावेळी विरोधतील नेत्यांना बदनाम करायचे. त्यांच्यावर गंभीर आरोप करून ईडी, सीबीआय, आयटीसारख्या केंद्रीय संस्थांचा ससेमिरा मागे लावायचा. एकदा का विरोधी नेता त्यांच्या आखत्यारीत गेला की नंतर केसेस मागे घ्यायच्या. हे उघड उघड त्यांचे थोतांड सुरू आहे. त्यांचे हे थोतांड हिंदुत्व मानायला मी तयार नाही,' असा घणाघातही ठाकरेंनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंत्री दीपक केसरकरांनी केलेल्या आरोपांवर बोलताना ठाकरे म्हणाले, 'त्यांचा आणि बाळासाहेबांचा कधीही संबंध आला नव्हता. बाळासाहेबांचे निधन २०१२ मध्ये झाले होते. केसरकर २०१४ मध्ये शिवसेनेत आले. तत्पुर्वी, ते शिवसेना उमेदवाराच्या विरोधात लढले होते. एकीकडे ते बाळासाहेबांचे विचार जागृत ठेवण्यासाठी बाहेर पडल्याचे सांगतात, तर दुसरीकडे बाळासाहेबांबाबतच अशी विधाने करतात. यातून त्यांचा बेगडीपणा स्पष्ट झाला आहे. त्यांनी स्वार्थासाठीच पक्ष फोडला,' असा आरोपही ठाकरेंनी केला.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT