Ajit Pawar - Abhijit Wanjarri
Ajit Pawar - Abhijit Wanjarri  Sarkarnama
विदर्भ

Ajit Pawar News : अजित पवारांनी सभागृहातच आमदार वंजारींना भरला दम; म्हणाले,"...नाहीतर अंगलट येईल!"

उमेश बांबरे .

Nagpur News : विदर्भ विकास महामंडळाच्या नामांकनावरुन व मुदतवाढीबाबत सरकार वेळकाढूपणा करत असल्याबाबतच्या आमदार अभिजित वंजारी यांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार भडकले.म्हणाले, महाविकास आघाडीच्या सरकारनेच वेळ काढूपणा केला आहे. त्यांनी निर्णय घेतला नाही. मी या गोष्टीचा साक्षीदार आहे.त्यामुळे मला फार बोलायला लावू नका, नाहीतर अंगलट येईल, असा दम भरला.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गुरुवारी विधान परिषदेत काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) भडकले. काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांनी सभागृहात विदर्भ विकास महामंडळाच्या मुदतवाढीबाबत सरकार वेळकाढूपणा करत असल्याबाबतचा प्रश्नावर बोलत होते.

ते म्हणाले, २७ डिसेंबर 2022 ला या सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत विदर्भ वैधानिक विकास महामंडळ, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ, उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळ यांना विदर्भ वैधानिक मंडळ संबोधण्यात यावे.

याबाबत उद्या आपण तशा पद्धतीचा प्रस्ताव राज्यपालाच्या माध्यमातून गृहखात्याकडे किंवा केंद्र सरकारकडे पाठवल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या त्यांनी पहिलं या मंडळाचं नामांकन असं होतं आणि तुम्ही आता मंडळ असं संबोधित केलं आहे आणि तसा प्रस्ताव परत पाठवला तर आम्ही काय करायचे. त्यामुळे हा प्रस्ताव परत येणार नाही याची हमी देणार आहे का. केवळ सरकारला या प्रस्तावाला केवळ मुदतवाढ द्यायची आहे आणि फक्त वेळ काढूपणा करायचा आहे, हा प्रश्न मी मांडत आहे. (Nagpur Winter Session)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार अभिजित वंजारी (Abhijit Wanjarri) यांच्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, महाविकास आघाडीच्या सरकारनेच वेळ काढूपणा केला आहे. त्यांनी निर्णय घेतला नाही. मी या गोष्टीचा साक्षीदार आहे. त्यामुळे मला फार बोलायला लावू नका, नाहीतर अंगलट येईल. आज याठिकाणी अभिजित वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे.

त्यासंदर्भात मी सभागृहाला स्पष्टपणे सांगू इच्छितो, आताच्या सरकारचे आणि केंद्र सरकारचे संबंध अतिशय सलोख्याचे आहेत. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यावर कुठल्याही परिस्थितीमध्ये अन्याय होणार नाही, ही खबरदारी आम्ही घेतली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT