Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Vote Chori : 'सीएसडीएस'च्या संजयकुमारांविरेाधात गुन्हा दाखल होताच पटोलेंनी टायमिंग साधलं; म्हणाले ‘त्या कारणामुळे काँग्रेसच्या आरोपांना बळच’

Nana Patole Statement : संजय कुमार यांच्यावर नागपूर जिल्ह्यातील रामटेक आणि नाशिक जिल्ह्यातील देवळाली विधानसभा मतदारसंघाचा चुकीचा डेटा दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

Rajesh Charpe

Nagpur, 21 August : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने मतचोरीचा आरोप करीत आहेत, त्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगालाच धारेवर धरले आहे. आयोग भाजपच्या प्रवक्त्याचे काम करीत असल्याचा त्यांचा आरोप आहे. यात विश्लेषक तसेच सीएसडीएसचे समन्वयक संजय कुमार यांनी चुकीचा डेटा दिल्याने त्यांच्यावर निवडणूक आयोगाच्या वतीने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आरोपांना आणखी बळ मिळाले आहे. हीच संधी साधून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी निवडणूक आयोग आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी केली आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बोगस मतदान झाल्याची आम्ही सातत्याने तक्रारी करीत आहोत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यानच्या पाच महिन्यांत लाखो मतदारांची वाढ कशी झाली, याची विचारणा करीत आहोत. सायंकाळी पाचनंतर पंधरा ते वीस टक्के मतदान झाले, याचे सीसीटीव्ही फुटेज आम्ही मागत आहोत. मात्र ते दिले जात नाही. सर्व सर्व लपवाछपवी सुरू आहे. निकालानंतरही दोन ते तीन वेळा टक्केवारी बदलण्यात आली आहे, असे सांगून नाना पटोले (Nana Patole) यांनी निवडणूक आयोगाचा कारभार बोगस असल्याचा आरोप केला.

निवडणूक आयोगानेसुद्धा चुकीचे ट्विट केले आहे, त्यामुळे आयोगावरही गुन्हे दखल करण्याची आवश्यकता आहे. संजय कुमार यांच्यावर गुन्हा दाखल होत असेल, तर केंद्रीय निवडणूक आयोग (Central Election Commission) आणि आणि तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याही विरोधात गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

ते म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांनी व्हीव्हीपॅट मोजण्यासाठी अर्ज केले होते, त्यासाठी लागणारे शुल्कही भरले होते. सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. या विरोधात अनेक उमेदवार कोर्टात गेले आहेत. तांत्रिक कारणे पुढे करून त्यांची याचिका फेटाळून लावण्यात आली आहे.

राहुल गांधी यांनी मतदार याद्यांचा घोटाळा बाहेर काढला आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने वेबसाइटवरून मतदारयादीच काढून टाकली आहे. ती माहिती का लपवली जात आहे? मग गुन्हेगार कोण असाही सवाल पटोले यांनी केला.

निवडणुकीत पारदर्शकता ठेवण्याची निवडणूक आयोगाची घटनात्मक जबाबदारी होती. मात्र तेच माहिती लपवत आहेत. संजय कुमार यांनी काय चुकीचे ट्विट केले, तो चौकशीचा भाग आहे असल्याचे पटोले म्हणाले. संजय कुमार यांच्यावर नागपूर जिल्ह्यातील रामटेक आणि नाशिक जिल्ह्यातील देवळाली विधानसभा मतदारसंघाचा चुकीचा डेटा दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT