Nana Patole-Praful Patel Sarkarnama
विदर्भ

Vidarbha Politic's : नाना पटोलेंनी प्रफुल पटेलांना पुन्हा दिला धोबीपछाड; भंडारा zp घेतली ताब्यात...

Bhandara ZP President Election : काँग्रेसच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष कविता उईके या भाजप नेत्यांच्या संपर्कात होत्या. मात्र, स्थानिक नेत्यांनी त्याची दखल घेतली नाही, त्यामुळे भाजपला जिल्हा परिषद आपल्या ताब्यात घेता आली नाही, अशी खमंग चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

Rajesh Charpe

Bhandara, 27 January : राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात टोकाचे वाद असताना भंडारा जिल्हा परिषद मात्र यास अपवाद ठरली होती. भारतीय जनता पक्ष-काँग्रेसने युती करून भंडारा जिल्हा परिषदेत अडीच वर्षे सरकार चालवले. सध्याच्या परिस्थितीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीकडे बहुमत असतानाही काँग्रेसने आपला अध्यक्ष निवडून आणून भाजप आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांना पुन्हा एकदा मात दिली आहे.

भंडारा जिल्हा परिषदेचे (Bhandara ZP) अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव होते. भाजपकडे अनुसूचित जमातीच्या माहेश्वरी नेवारे या एकमेव उमेदवार होत्या. मात्र, त्यापूर्वीच त्यांचे जात प्रमाणपत्र न्यायालयाने अवैध ठरवले. त्यामुळे भाजपचा नाईलाज झाला होता. दुसरीकडे, काँग्रेसच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष कविता उईके या भाजप नेत्यांच्या संपर्कात होत्या. मात्र, स्थानिक नेत्यांनी त्याची दखल घेतली नाही, त्यामुळे भाजपला जिल्हा परिषद आपल्या ताब्यात घेता आली नाही, अशी खमंग चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

विशेष म्हणजे भाजपने निरीक्षक म्हणून प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांना भंडाऱ्यात पाठवले होते. मात्र, त्यांनाही फार काही करता आले नसल्याचे दिसून येते. भंडारा जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडूक २०२१मध्ये पार पडली होती. त्यावेळी काँग्रेस आणि भाजपने युती केली होती. काँग्रेसकडे अध्यक्षपद, तर भाजपकडे उपाध्यक्षपद सोपवण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही तडजोड करण्यात आली होती. आता पटेल आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सहभागी आहेत.

विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी चांगलीच एकी दाखवली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पराभवापासून थोडक्यात बचावले होते. हे बघता काँग्रेसला जिल्हा परिषदेपासून लांब ठेवण्यासाठी नेते दबावाचे राजकारण करतील, अशी आशा होती. मात्र, महायुतीने भंडारा जिल्हा परिषदेवर झेंडा फडकावण्याची चालून आलेली संधी गमावली आहे.

भंडारा जिल्हा परिषद ही ५२ सदस्यांची असून सर्वाधिक २१ सदस्य काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस १३ सदस्य आहेत. शिवसेना १, बहुजन समाज पक्ष १, वंचित १ व अपक्ष ३ असे सदस्य आहेत. अडीच वर्षांपूर्वी काँग्रेसने भाजपचे तत्कालीन माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटातील १२ पैकी ६ सदस्य मते फोडून अध्यक्षपद पटकावले होते. महायुतीकडे आता बहुमत होते, त्यामुळे अध्यक्ष त्यांचाच होईल, असे एकंदरित चित्र होते.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT