Wardha Lok Sabha Constituency : केंद्रात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेली विकासकामे आणि समाजातील सर्व घटकातील नागरिकांसाठी राबविण्यात आलेल्या योजनांमुळे आज विरोधी पक्षाकडे निवडणुकीच्या प्रचार करण्यास कोणतेही मुद्दे नाहीत. परिणामी विरोधक जाती, धर्म, राम मंदिर यांसारखे मुद्दे उपस्थित करत नागरिकांच्या भावना भडकाविण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसला माहीत आहे की आपला पराभव निश्चित आहे. त्यामुळेच काँग्रेसचे युवराज निकालानंतर देशात आग लावण्याचे प्रयत्न करत आहेत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर केला.
वर्धा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी जाहीर सभा झाली. या सभेत मोदी यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवित गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या विकासकामांचा आणि योजनांचा आढावा घेतला. तसेच पुढील काळात सत्ता आल्यानंतर प्राधान्याने राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देत या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
प्रत्येक कुटुंबातील लोकांना ७० वर्षे पूर्ण झालेल्या लोकांच्या आरोग्याची जबाबदारी मोदींची राहील. त्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार केंद्र सरकार करेल.
वर्धा (Wardha), सेवाग्राम, हिंगणघाट या भागात चांगली रेल्वेसेवा चांगली सेवा झाली आहे. वर्धा-यवतमाळ-वाशीम या भागात रेल्वेचे जाळे विनले जात आहे, या भागाचा विकास होत आहे.
अमरावतीमध्ये टेक्सटाईल्स पार्कदेखील बनवले जात आहे. त्यामुळे विदर्भाचा आता चांगला विकास होत आहे.
हायवे- एक्स्प्रेस वे हा विदर्भातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी समृद्धी ठरणार आहे.
शेतकऱ्यांच्या आणि गोर गरिबांच्या विकासाची विरोधी भूमिका ही नेहमीच काँग्रेसची राहिलेली आहे.
'बारशाला गेला आणि बाराव्याला आला', अशीच भूमिका काँग्रेसची (Congress) असून विदर्भाला काँग्रेसच्या धोरणाचे मोठे धोके सहन करावे लागले आहेत.
विकसित भारताची मुहूर्तमेढ रोवणारी ही 2024 ची लोकसभा निवडणूक आहे.
पुढील पाच वर्षांत महिला बचत गटांतील महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रात नेणार. तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनविणार
गँरंटी देण्यासाठी मोठी हिम्मत लागते. संकल्प लागतो. रोड मॅप लागतो. गॅरंटी ही तीन अक्षरांचा खेळ नाही. सतत त्यासाठी काम करणे हे गरजेचे असते.
राज्यात सत्ताधारी असलेले एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस-अजित पवार (Ajit Pawar) यांचे सरकार विदर्भाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.