PM Narendra Modi Sarkarnama
विदर्भ

Narendra Modi Speech : 'काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचं राजकारण संपवलं', नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

PM Modi Ramtek Sabha : रामटेकमध्ये नितीन गडकरी, राजु पारवे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधित करताना इंडिया आघाडीवर कडाडून हल्ला चढवला. यांना गरिबाराचा मुलगा पंतप्रधान झालेला पाहवत नाही.

Roshan More

PM Modi Ramtek Sabha : काँग्रेस सत्तेबाहेर गेली की संविधान धोक्यात आहे, अशी ओरड करते. काँग्रसने कट रचून एसी, एसी, ओबीसी समाजाला मागे ठेवले. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकारण काँग्रेसले संपवलं. त्यांना भारतरत्न पासून वंचित ठेवले. भाजपच्या मदतीने केंद्रात सत्ता आल्यानंतर बाबासाहेबांना भारतरत्नाने गौरवण्यात आले. दलित राष्ट्रपती, आदिवासी राष्ट्रपती भाजपने बनवले. इंडिया आघाडी मजबूत झाली तर ते देशाचे तुकडे करतील.तुमचे मत त्यांना शिक्षा करण्यासाठी आहे, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामटेकच्या जाहीर सभेत केला.

रामटेकमध्ये नितीन गडकरी (Nitin Gadkari), राजु पारवे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधित करताना इंडिया आघाडीवर कडाडून हल्ला चढवला. यांना गरिबाराचा मुलगा पंतप्रधान झालेला पाहवत नाही. गरीबाचा मुलगा पंतप्रधान झाल्यावर त्यांना लोकशाही, संविधान धोक्यात आल्याचे दिसते. मात्र, आपल्यावर कितीही हल्ला केला तरी आपण देशसेवेपासून मागे हटणार नाही, असे मोदींनी (Narendra Modi ) ठणकावून सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संविधान धोक्यात आल्याचे इंडिया आघाडीवाले भाकडकथा पसरवत आहेत. जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार आले होते तेव्हा देखील त्यांनी हेच सांगितले. आत्ता देखील ते हेच सांगत आहेत. म्हणजे यांच्याकडे नवीन कल्पना सुद्धा नाहीत. त्यांना देशात फूट पाडायची आहे. देशातील नागरिक एकत्र आले तर यांचे राजकारण संपेल, अशी भीती इंडिया आघाडीवाल्यांना वाटते आहे, असा टोल पंतप्रधान मोदींनी लगावला.

इंडिया आघाडी महाराष्ट्रात एकही जागा जिंकता कामा नये,तसेच 19 तारखेला तुम्ही फक्त एक निवडणार नाही तर एक हजार वर्षाचा पाया मजबूत करणार आहात, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. निवडणुकीत मीडिवाल्यांकडून सर्व्हे दाखवला जातो. मात्र मी त्यांचे पैसे वाचवण्याचा फाॅर्म्युला सांगतो. जेव्हा विरोधक माझ्या स्वर्गवासी आई वडिलांना अपशब्द वापरतील. मोदीला शिव्य देतील, ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करतील तेव्हा समजून जा की मोदी जिंकणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT