Anil Deshmukh Sarkarnama
विदर्भ

ladki Bahin Yojana : राष्ट्रवादीच्या देशमुखांनाही आवडली लाडकी बहीण योजना

NCP Anil Deshmukh liked the scheme ladki bahin yojana : लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करणारे फलक आपल्या मतदारसंघात लावले आहेत. आमचे सरकार आल्यानंतर पंधराशेएवजी तीन हजार रुपये देऊ असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

Rajesh Charpe

Nagpur : महायुती सरकारची लाडकी बहीण योजना जबरदस्त लोकप्रिय ठरत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या योजनेला सुरुवातील विरोध दर्शवला होता. बहिणीची फसवणूक केली जात असल्याचा आरोप केला होता. मात्र आता विरोधकही लाडक्या बहिणीचा प्रचार करू लागले आहेत.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि त्यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करणारे फलक आपल्या मतदारसंघात लावले आहेत. आमचे सरकार आल्यानंतर पंधराशेएवजी तीन हजार रुपये देऊ असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी सर्वच जिल्ह्यात रांगा लागल्या आहेत. भाजप तसेच महायुतीच्यावतीने ठिकठिकाणी अर्ज भरून देण्यासाठी केंद्र उघडले आहेत. महापालिका कार्यालयाच्या माध्यमातूनसुद्धा अर्ज स्वीकारले जात आहे. महायुतीचे आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते या योजनेचा महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी सरसावले आहेत.

ही योजना जाहीर केली तेव्हा काँग्रेस, शिवसेना (Shivsena) आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी फसवी योजना असा आरोप केला होता. राज्याला कर्ज बाजारी केली जाते आहे. लोकसभेत पराभव झाल्याने ही योजना आणली आहे. विधानसभेत या योजनेचा लाभ घेऊन तीन महिन्यानंतर ती बंद केली जाणार असल्याचाही आरोप केला जात आहे.

असे असले तरी महिलांनामध्ये ही योजना लोकप्रिय ठरत असल्याने विरोधकांनीही त्याचा राजकीय लाभ घेण्यास सुरुवात केली आहे. काटोल-नरखेड विधानसभेत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि सलील देशमुख यांनीसुद्धा यासाठी पुढाकार घेतला आहे.

देशमुख पिता-पुत्रांनी लावलेल्या फलकांवर लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ घ्या असे आवाहन करताना ही योजना महायुती सरकारने फक्त तीन महिन्यांसाठी आणली असल्याचे सांगितले आहे. तीन महिने देता येईल एवढ्याच निधीची तरतूद या योजनेसाठी केली आहे. पुढचे सरकार आमच्या मित्रपक्षांचे येणार आहे. आम्ही ही योजना पाच वर्षांसाठी राबवणार आहोत आणि बहिणीला तीन हजार रुपये देऊ असा दावाही त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT