Nagpur Corporation Election : Devendra Fadnavis-Ajit Pawar Sarkarnama
विदर्भ

Mahayuti Politic's : विधानसभा यशाने राष्ट्रवादीला भलताच कॉन्फिडन्स; फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 50 जागांवर केला दावा

Nagpur Corporation Election : युती असतानाही भाजप शिवसेनेसाठी फक्त 10 ते 12 जागा सोडत होती, त्यामुळे राष्ट्रवादीची मागणी भाजप कितपत मान्य करते, हे निवडणुकीच्या वेळीच समजेल.

Rajesh Charpe

Nagpur, 03 December : विधानसभेच्या निवडणुकीतील महायुतीच्या विजयाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलाच उत्साह संचारला आहे. या विजयात आमचाही वाटा आहे. विधानसभेत आम्हाला नागपूर जिल्ह्यात एकही जागा सोडण्यात आली नाही. आता, मात्र महापालिकेच्या निवडणुकीत ५० जागा देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ता प्रशांत पवार यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी (ता. 03 डिसेंबर) झाली. यात नागपूर महापालिकेच्या (Nagpur Corporation) किमान ५० जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाव्यात, असा ठराव करण्यात आला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी एकसंध असताना पक्षाचा एकच नगरसेवक निवडून आला होता. तोही सध्या शरद पवार यांच्या गटात आहे.

भाजपचे (BJP) १०८ नगरसेवक निवडून आले होते. युती असतानाही भाजप शिवसेनेसाठी फक्त १० ते १२ जागा सोडत होती, त्यामुळे राष्ट्रवादीची मागणी भाजप कितपत मान्य करते, हे निवडणुकीच्या वेळीच समजेल.

अजित पवार यांनी पक्ष हाती घेतला तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्यकर्ते शहरात काम करीत आहेत. अनेक समस्यांसाठी त्यांनी आंदोलने केले आहेत. जनतेची कामे करीत आहेत. ज्वलंत प्रशांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम करीत आहे. सर्वांचा जनतेता वावर आहे, संपर्क आहे. त्यांच्यात महापालिकेत निवडूण येण्याची क्षमता आहे. आजघडीला सुमारे शंभर सक्षम उमेदवार आमच्याकडे महापालिकेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचा प्रशांत पवार यांचा दावा आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. विधानसभेत भाजपच्या उमेदवारांसाठी प्रमाणिकपणे काम केले. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसला डावलणे भाजपला महागात पडू शकते, असा इशाराही प्रशांत पवार यांनी दिला. आमच्या सर्व कार्यकर्त्यांची महापालिकेची निवडणूक एकत्रच लाढवावी, अशी इच्छा असल्याचे पवार यांनी सांगितले.

विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने शहरात आणि ग्रामीण भागात प्रत्येक दोन जागांची मागणी केली होती. मात्र, यापैकी एकही जागा राष्ट्रवादीला देण्यात आलेला नाही. काटोल विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असतानाही अजित पवार यांनी त्यावरील आपला दावा सोडला आहे.

सध्या भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले आहेत. हे सर्व बघता राष्ट्रवादीची ५० जागांची मागणी ते कितपत पूर्ण करतात, यावरच महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT