Ajit Pawar Sarkarnama
विदर्भ

NCP Election Strategy : राष्ट्रवादीची विधानसभेसाठीची स्ट्रॅटेजी ठरली; अजितदादांच्या आमदाराने सर्वच सांगितले

Vijaykumar Dudhale

Akola, 06 September : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची रणनीती ठरली आहे. महायुतीमध्ये किमान 60 जागा घ्यायच्या आणि त्याच मतदारसंघावर फोकस करायचा. संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढायचा, अशा सूचना आम्हाला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती देत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पक्षाची विधानसभा निवडणुकीबाबतची स्ट्रॅटेजी सांगून टाकली.

लोकसभा निवडणुकीत आम्हाला 9 ते 10 जागा मिळ्याव्यात, अशी अपेक्षा होती. मात्र, तेव्हा आमची ताकद कमी पडली. आता विधानसभेला मात्र आम्ही 60 जागांच्या खाली यायचं नाही, असं ठरलं आहे. किमान 60 जागा घेऊन त्यावरच फोकस करायचा, असं पक्षाचं ठरलं आहे, असेही अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सांगितले.

शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी बाळापूर मतदारसंघावर (Balapur Constituency) दावा केला असेल, तो प्रत्येकाचा अधिकार आहे. सध्या अकोला जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत.

मागील वेळी बाळापूर विधानसभा राष्ट्रवादीनं लढवली होती, त्यामुळं या जागेवर आमचा दावा असणार आहे, असेही अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले.

अकोला मतदारसंघातून मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे नितीनकुमार तळे हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. आता त्याच मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दावा सांगितला आहे, त्यामुळे बाळापूर विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत अंतर्गत कलह होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

एकाच मतदारसंघावर दोनपेक्षा अधिक पक्षांनी दावा केलेला आहे. राष्ट्रवादीचा आमदार असलेल्या मतदारसंघावर मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपच्या नेत्यांनी दावा केलेला आहे, त्यामुळे जागा वाटप हा मुद्दा महायुती कसा सोडवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अनेक मातब्बर नेते एकाच मतदारसंघात आणि महायुतीमध्ये सध्या दिसून येत आहेत, त्यामुळे जागा कोणाला सुटणार हा कळीचा मुद्दा राहणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT