Bachhu Kadu-Navneet Rana Sarkarnama
विदर्भ

Amravati Lok Sabha Constituency : आता डायरेक्ट अन्‌ करेक्ट कार्यक्रम होईल; आक्रमक बच्चू कडूंचा राणांना कडक इशारा

Vijaykumar Dudhale

Mumbai, 28 March : आता कोणाशीही बैठक होणार नाही. बैठकीचे विषय आता संपले, आता डायरेक्ट कार्यक्रम होईल आणि करेक्ट कार्यक्रम होईल, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला दिला आहे. त्यामुळे अगोदरच्या शिवसेनेच्या अभिजित अडसूळ यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचे जाहीर केले असताना आता बच्चू कडू यांच्या इशाऱ्याने खासदार नवनीत राणा यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

महायुतीमध्ये (Mahayuti) असलेल्या आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचा खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या उमेदवारीला विरोध होता. त्यांच्या पक्षाकडूनही अमरावती लोकसभा मतदारसंघावर (Amravati Lok Sabha Constituency) दावा करण्यात आलेला होता, त्यामुळे राणा यांच्या भाजपकडून मिळालेल्या उमेदवारीला कडाडून विरोध दर्शविला आहे. आता कोणत्याही परिस्थिती अमरावतीमधून निवडणूक लढविण्याचे कडू यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अमरावती लोकसभा मतदारसंघातून खासदार नवनीत राणा यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे. राणा यांना दिलेल्या उमेदवारीबद्दल बच्चू कडू यांनी जोरदार नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राणा विरुद्ध बच्चू कडू वाद रंगण्याची शक्यता आहे. येत्या चार एप्रिल रोजी अमरावतीमधील रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कडू यांची बैठक होणार होती.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीला बच्चू कडू जाणार नाहीत, त्यामुळे हा वाद शांत होण्याऐवजी वाढण्याची चिन्हे आहेत. या वादातूनच आमदार बच्चू कडू कोणत्याही क्षणी महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आता तो कोणता निर्णय घेतात, याकडे लक्ष असतानाच त्यांनी अमरावतीमधून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.

आता कोणाशीही बैठक होणार नाही. बैठकीचे विषय आता संपले, आता डायरेक्ट कार्यक्रम होईल आणि करेक्ट कार्यक्रम होईल, असा खणखणीत इशारा आमदार बच्चू कडू यांनी महायुतीचे नेते आणि राणा दाम्पत्यांना दिला आहे. आम्ही राणांच्या विरोधात बंडखोरी करू आणि राणाला पाडू. महायुतीने आम्हाला त्यांच्या सोबत ठेवलं तर ठीक; नाही तर आम्ही कोणत्याही क्षणी महायुतीतून बाहेर पडू, असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT