Amravati News : खासदार नवनीत राणा यांचा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Navneet Rana : हिंमत असेल तर अमरावतीमधील हनुमान चालिसा थांबवून दाखवावी
Navneet Rana & Uddhav Thackeray.
Navneet Rana & Uddhav Thackeray.Google

Rana Vs Thackeray : हनुमान चालिसा पठणावरून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि अमरावती लोकसभा मतदार संघाच्या अपक्ष आमदार नवनीत राणा यांच्यात सुरू झालेलं राजकीय वैर अद्यापही संपलेलं दिसत नाही. खासदार राणा यांनी याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.

युवा स्वाभिमान पक्षाचे नेते तथा बडनेरा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवी राणा व त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांच्या पुढाकारातून अमरावती शहरातील हनुमान गढी येथे पाच दिवसीय शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलय. कथेच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान खासदार राणा यांनी पुन्हा एकदा ठाकरे यांच्यावर टीका केलीय.

Navneet Rana & Uddhav Thackeray.
Amravati News : एकीकडे अधिवेशन तर दुसरीकडे अमरावतीत 4 हजारांवर अंगणवाडी सेविका संपावर

मुंबईत ‘मातोश्री’ बाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी गेलेल्या राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर सुमारे 14 दिवसांपर्यंत राणा तुरुंगात होते. तरुंगातून बाहेर पडल्यानंतर खासदार राणा यांना रडू कोसळले. पती आमदार रवी राणा यांना घट्ट मिठी मारत त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती. तेव्हापासून जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा खासदार नवनीत राणा या उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतात. यंदा शिवमहापुराण कथा या आध्यात्मिक आयोजनाच्या व्यासपीठावरून राणा यांनी ठाकरेंवर टीका केली.

भानखेडा येथील हनुमान गढी परिसरात कथाकार प्रदीप मिश्रा हे शिवमहापुराण सांगणार आहे. तत्पूर्वी काढलेल्या कलश यात्रेच्या निमित्तानं बोलताना खासदार राणा म्हणाल्या की, हनुमान चालिसा पठण केली म्हणून आम्हाला तुरुंगात डांबण्यात आलं. तेव्हाच आम्ही अमरावतीच्या हनुमान गढी येथे 111 फुटाच्या हनुमान मूर्तीची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. आता अयोध्येतील पवित्र गढीवरून आणलेली माती अमरावतीच्या हनुमान गढीची शोभा वाढवत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आम्ही एकदा हनुमान चालिसा पठण केली, त्यामुळं आम्हाला जेलमध्ये जावं लागलं. आता अमरावतीत दिवसातून पाच वेळा हनुमान चालिसा पठण होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला त्यावेळी हनुमान चालिसा पठण करण्यापासून रोखलं. आता त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी अमरावतीमधील हनुमान गढीत दिवसातून पाच वेळा करण्यात येणारं हनुमान चालिसा पठण रोखून दाखवावं, असं आव्हानही खासदार राणा यांनी दिलं.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेतून खासदार राणा यांनी लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकल्याचं सांगण्यात येतेय. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार अमरावतीत येऊन गेलेत. त्यावेळी खासदार राणा या त्यांच्या स्वागतासाठी गेल्या होत्या. यापूर्वीची लोकसभा निवडणूक राणा यांनी अपक्ष उमदेवार म्हणून लढविली असली तरी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिला होता. आता राणा दाम्पत्य भाजपच्या संपर्कात आहे. राणा दाम्पत्य ‘राज्यात देवेंद्र तर केंद्रात नरेंद्र’ हा मंत्र सातत्याने जपत असतात. त्यामुळं यंदाची लोकसभा निवडणूक राणा या भाजपच्या पाठिंब्यानं लढतील अशी शक्यता वर्तविण्यात येतेय.

Edited by : Prasannaa Jakate

Navneet Rana & Uddhav Thackeray.
Amravati : परप्रांतीय नव्हे, महाराष्ट्रीयनच..., कंटाळलेल्या हॉटेल मालकानं लावलं बॅनर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com