Mohite Patil News : रणजितसिंह मोहिते पाटील धर्मसंकटात; फडणवीसांसोबत राहायचे की कुटुंबाला साथ द्यायची?

Madha Lok Sabha Constituency : रणजितसिंह मोहिते पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घाबरत आहेत. कारण ते भाजपचे आमदार आहेत. देवेंद्र फडणवीस यांना कसे डावलायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
Ranjitshinh -Dhairyasheel -jayshinh Mohite Patil
Ranjitshinh -Dhairyasheel -jayshinh Mohite PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 28 March : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोहिते पाटील पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होणार आहेत. धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारीच्या चिन्हावर माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवतील, असे सूतोवाच जयसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे. मात्र, कुटुंबीयांच्या निर्णयामुळे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यापुढे धर्मसंकट उभारले आहे. संकटकाळात पाठीशी उभे राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राहायचे की अस्तित्वाच्या लढाईत कुटुंबाला साथ द्यायची, असा प्रश्न त्यांच्यापुढे असणार आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohit Patil) हे भाजपकडून (BJP) इच्छुक होते. मात्र, भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांना माढ्याच्या रणांगणात उतरवले आहे. तिकीट नाकारल्यामुळे मोहिते पाटील हे कमालीचे नाराज झाले आहेत, त्यातूनच त्यांनी बंडाचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.

Ranjitshinh -Dhairyasheel -jayshinh Mohite Patil
Hemant Godse News : भाजप, भुजबळांच्या दाव्याने गोडसे आक्रमक; नाशिकसाठी मुख्यमंत्र्यांकडेच ठोकला तळ

माढ्यासाठी फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर हेही इच्छुक होते. त्यांच्यासाठी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ताकद लावली होती. एकीकडे भाजपतील बडे प्रस्थ मोहिते पाटील आणि दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीतील निंबाळकर हे दोघेही खासदार निंबाळकर यांच्या उमेदवारीवर नाराज आहेत.

आता मोहिते पाटील कुटुंबाने निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुतारी चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवतील, असे जयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitshinh Mohite Patil) हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घाबरत आहेत. कारण ते भाजपचे आमदार आहेत. देवेंद्र फडणवीस यांना कसे डावलायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. आम्ही त्यांना आठ जूनपर्यंत आमच्याकडे ‘शिवरत्न’ बंगल्यावर येऊ नका. आठ जूननंतर तुम्ही घराकडे या, असे सांगितल्याचे जयसिंह मोहिते पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे आमदार रणजितसिंह यांच्यापुढे एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Ranjitshinh -Dhairyasheel -jayshinh Mohite Patil
Maratha Reservation Politics : सकल मराठा समाजाचा उमेदवार कोणाच्या पथ्यावर?

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून संकट काळात झालेली मदत, तसेच साखर कारखान्यांसाठी सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून मिळालेली आर्थिक मदत, हे सर्व रणजितसिंहांच्या डोळ्यांसमोर असणार आहे. साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या सावरत असतानाच आता राजकीय अस्तित्वाचे संकटही मोहिते पाटील कुटुंबासमोर उभारले आहे. त्यामुळे संकटाच्या काळात पाठीशी ठामपणे उभे राहिलेल्या फडणवीस यांना डावलायचे की राजकीय अस्तित्वासाठी कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहायचे, याचा निर्णय रणजितसिंह मोहिते पाटील यांना करावा लागणार आहे, त्यामुळेच कुठला निर्णय घ्यावा आणि कुणाच्या पाठीशी उभी राहावे, या धर्मसंकटात ते सापडले आहेत.

R

Ranjitshinh -Dhairyasheel -jayshinh Mohite Patil
Dhairyasheel Mane : धैर्यशील मानेंचा पत्ता कट, शौमिका महाडिकांना संधी? हातकणंगलेत महायुतीचे गणित काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com