Eknath shinde Sarkarnama
विदर्भ

Operation Tiger : विदर्भात चर्चा ‘ऑपरेशन टायगर’ची; पण एकनाथ शिंदेंच्या गळाला लागला काँग्रेसचा बडा मासा!

Eknath Shinde Vidharbha Tour : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ‘ऑपरेशन टायगर’ राबविण्यासाठी नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. नागपूर ते गोंदिया या दोन्ह जिल्ह्यात त्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.

Rajesh Charpe

Nagpur, 21 February : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ‘ऑपरेशन टायगर’ राबविण्यासाठी नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. नागपूर ते गोंदिया या दोन्ह जिल्ह्यात त्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. या दरम्यान अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सर्वाधिक भर उद्धव ठाकरे यांच्यावर असताना काँग्रेसच्या एनएसयूआयचे माजी अध्यक्ष सुमुख मिश्रा हे सुद्धा शिंदेसेनेत सहभागी होणार असल्याचे समोर आले आहे. हे बघता ऑपरेशन टायगरचा फटका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह मनसे आणि काँग्रेसलाही बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सुमुख मिश्रा हे एकेकाळी शिवसेनेचे पूर्व विदर्भाचे संघटक किरण पांडव यांचे कार्यकर्ते होते. त्यानंतर ते काँग्रेसचे (Congress) दिग्गज नेते सतीश चतुर्वेदी यांच्या गटात गेले. ते युवक काँग्रेसचे अध्यक्षसुद्धा होते. नागपूर विद्यापीठाच्या विरोधात मिश्रा यांनी मोठे आंदोलन केले होते. या दरम्यान त्यांनी कुलगुरुंची खुर्ची बळकावून त्यावर ठाण मांडले होते. त्यामुळे मिश्रा यांच्या आंदोलनाची त्यावेळी चांगलीच चर्चा झाली होती.

आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेते प्रवेश केल्यानंतर मिश्रा यांना पुन्हा आक्रमक आंदोलकांची भूमिका करण्याची संधी प्राप्त होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून मिश्रा हे सक्रिय राजकारणापासून लांब आहेत. ते युवक काँग्रेसचे अध्यक्ष असतानाची काँग्रेसची टीम आता शिल्लक राहिली नाही.

किरण पांडव शिवसेनेते सक्रिय झाले आहेत. सतीश चतुर्वेदी जवळपास सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले आहेत. त्यांचे चिरंजीव व माजी आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांनी यापूर्वीच शिंदे सेनेत प्रवेश केला आहे.

काँग्रेसमधील गटबाजीचा फटका मिश्रा यांनाही बसला आहे, त्यामुळे नागपूर महापालिकेतील काँग्रेसचे माजी गटनेते तानाजी वनवे यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. किरण पांडव यांच्या नेतृत्वात पूर्व विदर्भातील काँग्रेसचे अनेक पदाधिकारी शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होणार आहेत. आजच त्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT