Operation Tiger News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगरसाठी नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. उद्या (शुक्रवारी) एकनाथ शिंदेंची आभार सभा होणार आहे. या सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी, नेते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.त्यामुळे उद्धव ठाकरेंची साथ कोण कोण सोडणार याविषयी चर्चा सुरू आहेत. विशेष म्हणजे ठाकरेंची साथ सोडणाऱ्यांमध्ये माजी जिल्हा प्रमुख राजू हारणे यांचे नाव समोर आले आहे. ते आपल्या शेकडो समर्थकांसह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
राजू हरणे तब्बल 11 वर्षे जिल्हा प्रमुख होते. काटोल विधानसभा मतदारसंघातून अनिल देशमुख यांच्या विरोधात त्यांनी विधानसभेची निवडणूकसुद्धा लढली होती. 1991 पासून त्यांनी शाखा प्रमुखापासून हरणे यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. एकनाथ शिंदे चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले तेव्हा हरणे यांनाच पहिली ऑफर देण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी ती नाकारली होती. यानंतर त्यांचेही दिवस फिरले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा प्रमुख पदावरून त्यांनी गच्छंती झाली.
हारणे यांची जिल्हा प्रमुख पद गेल्यापासून ते भाजपात जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. महाविकास आघाडीच्या विरोधात ते काम करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रचार सभेत हरणे यांचेही नाव घेतले. त्यामुळे तडकाफडकी त्यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.
दुसरीकडे त्यांचे कार्यक्षेत असलेल्या काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे चरणसिंग ठाकूर निवडूण आले आहेत. त्यामुळे हरणे यांची अवस्थ इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून त्यांना पुन्हा एकदा आपल्या मूळ पक्षात जाण्याची संधी मिळाली आहे. आपणच नव्हे तर नागपूर जिल्ह्यातील सुमारे 90 टक्के शिवसैनिक आपल्यासोबत धनुष्यबाण हाती घेणार असल्याचा दावा राजू हरणे यांनी केला आहे.
तत्पूर्वी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी शिवसेनेत येण्यासाठी रांगा लागल्या असल्याचे सांगितले आहे. मात्र कोणाला पक्षात घ्यायचे किंवा याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः छाननी करणार असल्याने काहींचा प्रवेश थांबवण्यात आला असल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.