Vijay Wadettiwar Sarkarnama
विदर्भ

Vijay Wadettiwar News : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार कडाडले; "राज्यात तीन तिघाडा, काम बिघाडा..."

Congress Politics : '' राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यात आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे..."

संदीप रायपुरे - Sarkarnama

Chandrapur Politics : बिहारने जातनिहाय जणगणना केली,त्यांच करावं तेवढं कौतुक कमी आहे.पण फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात मात्र अद्यापही जनगणना केली गेली नाही. जनगणना केल्यानंतरच विविध प्रवर्गाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.पण राज्यातील मनुवादी सरकार या मुद्द्यावर बोलायलाही तयार नाही.

जातीनिहाय जनगणेच्या मुदयावर संघ आडवा येत आहे काय,संघाची नेमकी भूमिका काय हे देखील स्पष्ट झाले पाहिजे असे सांगत विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. राज्यात मनुवादी विचाराचं सरकार आहे.ते बहुजनांना न्याय देऊ शकत नाही,असेही वडेट्टीवार म्हणाले.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला.त्यांनी राज्यातील घडामोडींवर भाष्य करताना जातीनिहाय जनगणनेवरुनही मोदी सरकारवर हल्लाबोल केला. वडेट्टीवार म्हणाले, राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यात आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. नांदेडची दुर्देवी घटना हे त्याचं उदाहरण आहे.चोवीस जणांचा मृत्यू मन हेलावणारी आहे.

राज्यात तिन तिघाड्यांचं, ठग्यांचं सरकार आहे.रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही.औषधेही मिळत नाही.चोवीस तासांत चोवीस बळी गेले.78 जण गंभीर आहेत.त्यांच्यावर तातडीन उपचार होत नाही.सहा सहा महिन्यांत मंत्री बदलले जातात.त्यामुळे विविध विभागांचे काम वाऱ्यावर आहे.राज्यात तिन तिघाडा, काम बिघाडा अशी स्थिती आहे असे वडेट्टीवार म्हणाले.

तुम्ही मनुवादी विचारांनी सरकार चालवणार काय, बहुजनांच्या हिताचा विचार करून त्यांना न्याय देणार आहात की नाही. ही भूमिका आता सरकारने स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे.महाराष्ट्र सरकारवर (Shinde- Fadnavis- Pawar Government) टीकेची झोड उठवताना बिहार सरकारची तोंडभरुन स्तुती वडेट्टीवार यांनी केली.बिहार सरकारने जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला.तो पूर्ण केला. सर्व माहिती लोकांच्या पुढे ठेवली असेही ते म्हणाले.

वडेट्टीवार म्हणाले, ओबीसींची(OBC) जातीनिहाय जनगणना करा ही मागणी आमचे नेते राहुल गांधी सातत्याने लावून धरत आहेत.मात्र, हे सरकार पळ काढू पाहत आहे.सरकारला पळ काढण्याचे कारण काय?असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.हिंदुत्ववादी सरकार म्हणून तुम्ही अजेंडा वापरता.या देशातील ओबीसी हिंदू नाहीत काय ? ओबीसींना आरक्षण मिळायला नको ? या प्रश्नांपासून शिंदे-फडणवीस-पवार सरकार पळ काढत असेल तर हे मोठे दुर्दैव आहे,असा हल्लाबोल त्यांनी केला.

राज्यात विविध ठिकाणी आंदोलन होत आहेत.त्यात बहुतांश आंदोलनात जातनिहाय जनगणनेची मागणी प्रामुख्याने मांडली जात आहे.पण रा़ज्य सरकार ओबीसींची जनजागरणयात्रा काढून जनगणनेच्या मुदयाला पध्दतशीर बगल देत आहे.आणी ओबीसींना हक्कापासून वंचित ठेवल्या जात आहे.हे पाप सरकार करत आहे.या मुदयावर निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या काळात जनताच त्यांना त्यांची जागा दाखविणार असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.

बिहार सरकार जातनिहाय जनगनणा करून आकडे सार्वनजिक करण्याचे धाडस दाखवते. मग महाराष्ट्र सरकारला ही भूमिका घ्यायला का अडचण जात आहे.यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर आडवा येत नाही हे ही स्पष्ट झाले पाहिजे. एकीकडे राज्यात जातनिहाय जनगणनेची मागणी जिकडेतिकडे होत आहे.या मुदयावर अनेक आंदोलन होत आहेत.पण सरकार मात्र वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत असल्याचे टीकास्त्रही सरकारवर सोडले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT