Praful Patel News : महाशिवरात्रीनिमित्त राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी गोंदिया शहरालगत असलेल्या नागराधाम येथील स्वयंभू पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी शिवलिंगाची पूजा करून देशातील सर्व नागरिकांना महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद लाभो अशी प्रार्थना केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त करत मनात असलेली खदखद पुन्हा एकदा व्यक्त केली.
महायुतीचे जागावाटप अद्याप अंतिम झालेले नाही. यासंदर्भात महायुतीतील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक होऊन जागावाटपावर शिक्का मोर्तब होणार आहे. त्यानंतरच कोणती जागा कोणाला मिळाली हे समजणार आहे. सध्यातरी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा प्रफुल पटेल यांच्या मनात असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले.
महायुतीत भंडारा गोंदियाची ही जागा भाजपकडे आल्याची चर्चा रंगलेली आहे. असे असताना राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्या दाव्याने पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत लोकसभेच्या जागावाटपाबाबत बैठक होऊन चित्र स्पष्ट होणार असल्याचे प्रफुल पटेल यांनी सांगितले. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील लोकांनाच वाटते की मी त्यांचे लोकसभेत नेतृत्व करावे, असे सांगून पटेल यांनी तिढा वाढवला आहे.
महाशिवरात्रीनिमित्त राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी गोंदिया शहरालगत असलेल्या नागराधाम येथील स्वयंभू पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन घेतले. यावेळी प्रफुल पटेल यांनी शिवलिंगाची पूजा केली. तसेच देशातील सर्व नागरिकांना महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद लाभो, अशी प्रार्थनाही केली. त्यानंतर त्यांना भंडारा-गोंदिया लोकसभेवर विचारलं असता, प्रफुल पटेल यांच्या मनात असलेली खदखद पुन्हा एकदा समोर आली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'निवडणूक लढायला पाहिजे अशी नागरिकांची इच्छा आहे, पण आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि महायुतीमध्ये असताना चर्चा झाल्याशिवाय आपल्या उमेदवारीबद्दल बोलू शकत नाही" असे म्हणत "उद्या संधी मिळाली तर नक्कीच लढेल, असेही प्रफुल पटेल म्हणायला विसरले नाहीत. त्यामुळे राज्यसेवेवर गेल्यानंतरदेखील प्रफुल पटेल यांना भंडारा-गोंदिया लोकसभेच्या मोह सुटला नाही हे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
Edited By : Umesh Bambare
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.