Narendra Modi  Sarkarnama
विदर्भ

Narendra Modi Nagpur Tour : ठरलं...पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी प्रथमच संघ मुख्यालयात जाणार; गुढी पाडव्याला नागपूर दौऱ्यावर

RSS Headquarters News : पंतप्रधानापदाच्या 11 वर्षांच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी अनेकदा नागपूरला आले. भाजपचे कार्यकर्ते, संघाच्या स्वयंसेवकांसोबत चर्चा केली. मात्र या काळात ते 2014 नंतर एकदाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात गेले नाहीत.

Rajesh Charpe

Nagpur, 25 March : पंतप्रधानापदाच्या 11 वर्षांच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी अनेकदा नागपूरला आले. भाजपचे कार्यकर्ते, संघाच्या स्वयंसेवकांसोबत चर्चा केली. मात्र या काळात ते 2014 नंतर एकदाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात गेले नाहीत. स्वयंसेवक असताना मोदी मुख्यालयात जात नसल्याने त्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ व तर्क लावले जात होते. या सर्व चर्चांना आता स्वतः मोदीच पूर्णविराम देणार आहेत. कारण, गुढी पाडव्याला येत्या रविवारी (ता. 30 मार्च) मोदी नागपूरला येत आहेत. या दौऱ्यात ते रेशीमबागेतील संघ मुख्यालय जाणार आहेत, यासोबतच ते दीक्षाभूमीलाही भेट देणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा नियोजित संभाव्य दौरा आल्यानंतर नागपूर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी या दोन्ही ठिकाणांसह त्यांच्या संपूर्ण दौऱ्याची पाहणी केली. यावेळी विमानतळ प्रशासन, दीक्षाभूमी आणि माधव नेत्रालयाचे प्रतिनिधीही उपस्थित  होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित माधव नेत्रालयाच्या इमारतीच्या भूमिपजूनसाठी पंतप्रधान मोदी नागपूला येणार आहेत. त्यांचे ता. 30 मार्च रोजी नागपूर शहरात आगमन होणार आहे. पंतप्रधान मोदी विमानतळावर आगमन झाल्यानंतर रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन, त्यानंतर दीक्षाभूमी आणि तेथून ते माधव नेत्रालय येथे जाणार आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान मोदी यांनी नागपूरच्या राजभवनावर मुक्काम केला होता. या दरम्यान पहिल्या टप्प्याची निवडणूक आटोपली होती. फक्त ५२ टक्के मतदान झाल्याने मोदी यांनी भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना याबाबतची विचारणा केली होती. नागपूरच्या उन्हामुळे मतदानाला फटका बसल्याचे सांगून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वेळ मारून नेली होती. त्यावर मोदी यांनी ‘नागपूरवाले कबसे धूप को ठरले लगे‘ अशी मिश्कील टीपणी केली होती. त्यावेळीसुद्धा त्यांनी संघ मुख्यालयात जाणे टाळले होते. त्यांना भेटायला मात्र काही स्वयंसेवक आवर्जून गेले होते.

त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक संयुक्त जाहीर सभा नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथे आयोजित करण्यात आली होती. त्या सभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामटेकचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी ते आले होते.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT