Raj Thackeray-CM Majhi Ladki Bahin Yojana Sarkarnama
विदर्भ

Raj Thackeray On Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत राज ठाकरेंचे मोठे विधान; ‘कदाचित दुसऱ्या महिन्याचा हप्ता मिळेल; पण...’

Vijaykumar Dudhale

Nagpur, 24 August : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत भाष्य केले आहे. या योजनेच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त करताना ‘पैसे कुठे आहेत सरकारकडे?’ असा सवाल उपस्थित केला आहे, त्यामुळे लाडकी बहिण योजनेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) हे विदर्भाच्या दौऱ्यावर होते. दौरा झाल्यानंतर त्यांनी आज नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. या संवादादरम्यान राज ठाकरेंना लाडकी बहिण योजनेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही योजना किती दिवस चालेल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा (Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana) लाभ पहिला महिन्यांत मिळेल. कदाचित दुसरा महिनाही जाईल. पण, प्रत्येक महिन्यात वाटपासाठी पैसे कुठे आहेत, सरकारकडे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिमिक्री करत त्याच्यामध्ये अजितदादांनी पण सांगितलं नाही का. निवडून दिलं तर पुढचे हप्ते मिळतील. पण ते तसे होणार नाही.

तुम्ही किती पैसे वाटणार आहात? पण सरकारकडे वाटायला पैसे पाहिजे ना. तेवढ्यात पत्रकारांनी ‘सही करून निघालोय चेकवर’ या अजित पवारांच्या विधानाची आठवण करून दिली. त्याचीही राज ठाकरे यांनी खिल्ली उडवली. त्याबाबत राज म्हणाले, कशावर? पहिल्या हप्त्याची असेल, असे सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाच मागण्या केल्या होत्या. त्या संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी मी लवकरच पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार आहे, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

विधानसभेची आगामी निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही स्वतंत्रपणे लढणार आहे. आम्ही कोणासोबतही युती अथवा आघाडी करणार नाही, याच पुनरुच्चार पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी केला. महायुती किंवा महाविकास आघाडीत तुल्यबळ बंडखोर आले तर उमेदवार देण्यासंदर्भात बघू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT